(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi season 5 : 'ही घरात नसली तरी काही फरक पडत नाही, ही अतिशय मूर्ख मुलगी'; निक्की जान्हवीने एकमेकींना केलं नॉमिनेट
Bigg Boss Marathi Season 5 : नॉमिनेशन टास्कमध्ये जान्हवी आणि निक्की या दोघींनीही एकमेकींना नॉमिनेट केलं असल्याचं पाहायला मिळालं आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरातली (Bigg Boss Marathi new season) नाती ही प्रत्येक क्षणाला बदलत असतात. त्यातच आता दोन जीवलग मैत्रीणींमध्ये चांगलीच फूट पडल्याचं पाहायला मिळतंय. इतकच नव्हे तर या दोन सख्ख्या मैत्रीणींनी एकमेकींना नॉमिनेटही केलंय. त्यामुळे आता जान्हवी आणि निक्की एकमेकींच्या पक्क्या वैरीणी झाल्याचं चित्र सध्या बिग बॉसच्या घरात आहे.
बिग बॉसच्या घरात नुकताच नॉमिनेशन टास्क पूर्ण झाला. त्यामध्ये सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये एकमेकींना वाचवण्यासाठी जीवाची धडपड करणाऱ्या जान्हवी आणि निक्की या दोघींनीही एकमेकींनाच आता नॉमिनेट केलंय. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरातली नाती फिरताना पाहायला मिळतंय.
'ज्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसलाय...'
निक्कीने वैभव आणि डीपी त्याचप्रमाणे जान्हवी आणि सूरज या दोघांनाही नॉमिनेट केलंय. वैभवला नॉमिनेट करताना निक्कीने म्हटलं की, 'याला काही डोकं नाहीये, याचा गेमही नाहीये, तो फक्त माझ्या अवतीभवती तो असायचा. त्याने इरीनालाही सेफ करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचं आणि तिचं नातंही फेक होतं. त्यासाठी याचे काहीही प्रयत्नच केले नाही. त्यामुळे याचं घरातलं योगदान हे शून्य आहे आणि हा घरात नसेल तर काहीही फरक पडणार नाही.'
'ही घरात नसली तरी कुणाला काही फरक पडत नाही'
जान्हवीला नॉमिनेट करताना निक्कीने म्हटलं की, 'दुसरी जोडीही बिनकामाची आहे. ती जोडी आहे एक माझी सावली. या व्यक्तीलाही माझ्याशिवाय घरात दुसरं काहीही दिसत नाही. ती या घरात एक कॅरेक्टर पकडून आली आहे. कारण ती सारखं म्हणते की मी अशी नाहीये, मी अशी नाही वागत, मग तू तसं का दाखवते. ही महाशय काहीही करत नाही, फक्त माझ्या अवतीभवती फिरत असते. हिची आर्या ही पक्की शत्रू होती. पण जेलमध्ये गेल्यापासून आर्या तिची सगळी सेवा करतेय. आता तिला निक्कीशी भिडायचं आहे. मग हे एका महिन्याचं बहिणीचं नातं वैगरे काय होतं. ही जरी घरात नसली तरी कुणाला काहीही फरक पडत नाही म्हणून मी हिलाही नॉमिनेट करत आहे.'
ही अतिशय मूर्ख मुलगी - जान्हवी
जान्हवीने निक्कीला नॉमिनेट करताना म्हटलं की, 'ती मला असं वाटतंय की, फक्त भटकत असते. मी अशी आहे, मी तशी आहे, याच्यावर ती गेम जिंकू शकणार नाही. तेवढी तिची क्षमता नाही. ही अतिशय मूर्ख मुलगी आहे.'