एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : आर्या अभिनंदन तमाम महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केलीस, आर्याला शिक्षा करायचीय, तर अरबाजलाही करा; बिग बॉसप्रेमींची मागणी

Bigg Boss Marathi 5 : आर्याने नियम मोडल्यामुळे तिला शिक्षा होणार असेल, तर अरबाजनेही नियम मोडलाय, त्यालाही शिक्षा व्हायला हवी, असं नेटकरी म्हणत आहेत.

Bigg Boss Marathi New Season : बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सी कार्यात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जादुई हिऱ्याच्या कॅप्टन्सी कार्यात निक्की आणि आर्या यांच्यात धक्काबुक्की झाली. यानंतर आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. बिग बॉस मराठीमध्ये हिंसा झाल्यामुळे घरातील महत्त्वाचा नियम मोडला गेला आहे. यामुळे आता बिग बॉस आर्याला मोठी शिक्षा देणार आहे.

प्रेक्षकांचा आर्याला पाठींबा, अरबाज निशाण्यावर

बिग बॉस मराठीचाा नवीन प्रोमो समोर आला आहे. आजच्या भागातील नवीन प्रोमोमध्ये बिग बॉस आर्याला शिक्षा सुनावणार असं दाखवण्यात आल आहे. प्रोमोमध्ये बिग बॉस' म्हणत आहेत, "घरात आर्या आणि निक्की यांच्यामध्ये एक निंदनीय घटना घडली. आर्या यांनी हे निंदनीय कृत्य करुन बिग बॉसच्या मुलभूत नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे बिग बॉस आर्या यांना आता शिक्षा ठोठावत आहे." त्यामुळे बिग बॉस आर्याला नेमकी काय शिक्षा सुनावतात, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

'आर्या अभिनंदन तमाम महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केलीस'

दरम्यान, एकीकडे निक्कीवर हात उचलल्यामुळे आर्याला बिग बॉस शिक्षा देणार आहेत, तर दुसरीकडे नेटकऱ्यांचा आर्या पाठिंबा मिळताना दिसत आहे. बिग बॉस प्रेमी आर्याच्या पाठीशी उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. आर्याने नियम मोडल्यामुळे तिला शिक्षा होणार असेल, तर अरबाजनेही नियम मोडलाय, त्यालाही शिक्षा व्हायला हवी, असं नेटकरी म्हणत आहेत. अरबाजनेही अभिजीतला धक्काबुक्की केली आणि जान्हवीचा हात पिरगळला. 

'आर्याला शिक्षा करायचीय, तर अरबाजलाही करा'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉसप्रेमींची मागणी

एकाने कमेंटमध्ये लिहिलंय, "आर्या अभिनंदन तमाम महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केलीस!". दुसऱ्याने म्हटलंय, "अरबाजने जान्हवीचा आणि पंढरीचा हात पिरगळला". तसेच "अभिजीतला पण जोरात धक्का दिला. त्याला पण शिक्षा झाली पाहिजे". तिसऱ्याने म्हटलंय, "आर्याला जर शिक्षा झाली तर अरबाज निक्की आणि जान्हवीला पण व्हायला पाहिजे". आणखी एकाने लिहिलंय, "जर आर्या चुकीची ठरली असेल तर, अरबाजचा पण ताबा सुटला होता. त्यानेही अभिजितला चुकीच्या पद्धतीने धक्का दिला आहे, त्याला शिक्षा करा.आम्ही काय डोळे झाकून बिग बॉस बघत नाही, नाहीतर ॲक्शन रिप्लेमध्ये आर्याची चापट दाखवा". 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : बिग बॉस आर्यानं निक्कीला कानफडवल्याचा व्हिडीओ दाखवा; नेटकऱ्यांची बिग बॉसकडे मागणी

स्नेहल पावनाक
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Swara Bhasker Hospitalised: 'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
Gashmeer Mahajani Post Viral: 'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
Nana Patekar Comment On Madhuri Dixit: 'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, नेमकं काय घडलं?
'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, अन्...
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget