Gharo Ghari Matichya Chuli : बाळूमामा नंतर स्टार प्रवाहच्या नव्या कोऱ्या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार सुमीत पुसावळे, प्रोमो आला समोर
Gharo Ghari Matichya Chuli : सुमीत पुसावळे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत ऋषीकेश ही भूमिका साकारणार आहे. कुटुंबावर आधारित असणारी ही मालिका 17 मार्चपासून संध्याकाळी 7.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Sumit Pusavale in Star Pravah Serial : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर 17 मार्चपासून 'घरोघरी मातीच्या चुली' (Gharoghari Matichya Chuli) ही नवी कोरी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत रेश्मा शिंदे ही प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तर तिच्यासोबत बाळूमामा फेम अभिनेता सुमीत पुसावळे हा देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपासून सुमीत बाळूमामा ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. पण आता सुमीत या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच वाहिनीकडून या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आलाय.
सुमीत पुसावळे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत ऋषीकेश ही भूमिका साकारणार आहे. कुटुंबावर आधारित असणारी ही मालिका 17 मार्चपासून संध्याकाळी 7.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत सुमीत हा मोठ्या मुलाची तसेच रेश्माच्या नवऱ्याची भूमिका साकारताना पाहायला मिळेल. त्यामुळे या मालिकेच्या माध्यमातून रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
बाळूमामा मालिकेला निरोप देताना सुमीत भावूक
सुमीतने बाळूमामा ही मालिका सोडल्याचं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सांगतलं होतं. यावेळी सुमीतने बाळूमामा मालिकेच्या सेटवरचा एक फोटो शेअर भावनिक कॅप्शन लिहिलं होतं. तसेच या कॅप्शनमध्ये त्याने लवकरच भेटू म्हटलं होतं. त्यामुळे सुमीत आता कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला याची उत्सुकता होती. पण स्टार प्रवाह वाहिनीकडून या मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आलाय. ज्यामध्ये सुमीत हा मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये तगडी स्टारकास्ट
'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत तगडी स्टारकास्ट असणार आहे. या मालिकेत रेश्मा शिंदेची मुख्य भूमिका आहे. तर, सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने व बालकलाकार आरोही सांबरे यांच्या महत्त्वाच्या भूमिका असल्याचे मालिकेच्या प्रोमोतून समोर आले.