Gaurav More : वडिलांच्या आठवणीने गौरव मोरे भावूक, त्यांची इच्छा पूर्ण झाली पण...
Gaurav More Crying : मराठीनंतर हिंदीतील कॉमेडी शोमध्ये धुमाकूळ घालत आहे. अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा गौरव मोरे मात्र भावूक झाल्याचे दिसले.
Gaurav More Crying : छोट्या पडद्यावर आपल्या कॉमेडीने धुमाकूळ घालणारा फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख असणारा अभिनेता गौरव मोरे (Gaurav More) आता मराठीनंतर हिंदीतील कॉमेडी शोमध्ये धुमाकूळ घालत आहे. अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा गौरव मोरे मात्र भावूक झाल्याचे दिसले. ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी शोमध्ये गौरव आपल्या वडिलांच्या आठवणीत हळवा झाल्याचे दिसून आले.
काही दिवसांपूर्वीच गौरव मोरेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो सोडत असल्याचे जाहीर केले होते. गौरव मोरे हा सध्या सोनीवरील ‘मॅडनेस मचाएंगे’ या शोमध्ये काम करत आहे. तिथेही आपल्या परफॉर्मन्सने गौरवने छाप सोडली आहे. ‘मॅडनेस मचाएंगे’मधील एका सेगमेंटमध्ये कलाकारांनी आपल्या आठवणी सांगितल्या. त्यात गौरव भावूक झाल्याचे दिसून आले. यावेळी गौरवने आपल्या बाबांच्या स्वप्नांचा उल्लेख केला.
गौरवने सांगितले की, माझे वडील नेहमी बोलायचे आपल्या घरात चारचाकी पाहिजे. तेव्हापासून मी ठरवलं होतं की, सेकंड हँड असली तरीही आपल्या घरात चारचाकी गाडी आली पाहिजे. कारण लोकांना ज्याच्या घरासमोर कार असते तोच माणूस मोठा वाटत असतो.”
गौरवने भावूक होत आपली आठवण सांगताना पुढे म्हटले की, त्यावेळी मी एका शोमध्ये काम करत होतो. या शोसाठी मिळालेले पैसे साठवले आणि कार घ्यायचे ठरवले. मला एक व्यक्ती भेटला, त्याने दीड लाखात कार देणार असल्याचे म्हटले. पण, माझ्याकडे त्यावेळी एक लाख 10 हजार रुपयेच असल्याचे त्याला सांगितले. बाबांची इच्छा म्हणून कार घेतली. घरी कार आली पण बाबा आम्हाला सोडून गेले. माझ्या गाडीत बाबांशिवाय इतर सगळेजण बसतात. पण, आता नवीन कार घेतल्यावर त्यात बाबांचा फोटो ठेवेल आणि चला आपण एकत्र प्रवास करुयात असे मनाला सांगेल असेही गौरवने सांगितले.
View this post on Instagram
गौरव मोरेंवर नेटकरी नाराज...
महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. हिंदीत शो मिळाल्याने मराठीकडे पाठ फिरवली का, असा सवाल चाहत्यांनी गौरवला विचारला. त्यावर गौरवने “Respect बडी चीज है भाई” असे म्हटले. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमध्ये स्किटमध्ये ‘I am a गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा, टा ना ना ना…’ या वाक्याने त्याची धमाकेदार एन्ट्री होत असे. त्याच्या या एन्ट्रीला प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटत असे.