Dnyaneshwar Mauli Serial : सोनी मराठीवर दिव्यत्वाचे दर्शन, 'ज्ञानेश्वर माऊली'तून उलगडणार संत ज्ञानेश्वर महाराजांची चरित्रगाथा
सोनी मराठी वाहिनीवर उलगडली जात आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची चरित्रगाथा 'ज्ञानेश्वर माऊली' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला
Dnyaneshwar Mauli Serial : महाराष्ट्राला संतपरंपरेचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे अनेक संतांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला नेहमीच येत असतात. सोनी मराठी वाहिनीवर 27 सप्टेंबरपासून 'ज्ञानेश्वर माऊली' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. संत ज्ञानेश्वर महारांजाची चरित्रगाथा या मालिकेच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे. 'ज्ञानेश्वर माऊली' या मालिकेतील शीर्षकगीताला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. हे शीर्षकगीत बेला शेंडेने गायले आहे. हे शीर्षकगीत संगीतबद्ध होतानाचा व्हिडीओ सोनी मराठी वाहिनीने शेअर केला होता. या शीर्षकगीताचे गीतकार दिग्पाल लांजेकर आहेत. यातील मंत्रमुग्ध करणारे संगीत मनाला स्पर्श करुन जाते. या मालिकेच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या संगीतबद्ध करण्यात येणार आहेत.
आजही महाराष्ट्रात अनेक वारकरी, माळकरी आहेत. भक्ती संप्रदायाचे अनेक मंडळी आहेत. हा भक्तीसंप्रदाय ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेला असल्याने या मालिकेचा प्रेक्षकवर्गदेखील माऊलींची चरित्रगाथा जाणणारा असेल. चिन्मय मांडलेकर या मालिकेची निर्मिती करणार
आहे. तर या मालिकेचे दिग्दर्शनदेखील दिग्पाल लांजेकर करणार आहेत. भगवतगीतेचे सामान्य मानसाला कळेल असे रुपांतर, पसायदानची कलाकृती जगात पोहोचवणारे ज्ञानेश्वर महाराज या मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचणार आहेत.
सोनी मराठीवाहीने मालिकेतील काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली होती, मुक्ताईने माऊलींच्या पाठीवर मांडे कसे भाजले अशा अनेक गोष्टी लहानपणापासून ऐकायला मिळत असतात. त्या सर्व गोष्टी मालिकेतील
प्रोमो व्हिडीओमधून दिसून आल्या आहेत. त्यामुळे आता ग्राफिक्स, स्पशेल इफेक्ट, अत्याधुणीक तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर करत ही मालिकाप्रेक्षकांच्या पसंतीस पडणार आहे.
चिन्मय मांडलेकर गेले होते आळंदीत
'ज्ञानेश्वर माऊली' ही मालिका येणार म्हणून या मालिकेचे निर्माते चिन्मय मांडलेकर आळंदीत गेले होते. आळंदीत जाऊन त्यांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी ते फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केले. त्याफोटोवर त्यांनी
'आज माऊलींच्या चरणी जाण्याचा योग आला' अशी कॅप्शन दिली होती.