Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : दिशा वकानी 'तारक मेहता' शोमध्ये परतणार का? दिलीप जोशी म्हणाले...
तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)या मालिकेमध्ये दिशा कधी कमबॅक करणार आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेमधून विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) काही दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा आई झाली आहे. दिशा आणि तिचा मयूर पाडिया यांना पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. पाच वर्षा पूर्वी दिशानं तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमधून ब्रेक घेतला. या मालिकेमध्ये दिशा कधी कमबॅक करणार आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. आता याबाबत एका मुलाखतीमध्ये अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी सांगितलं आहे.
दिलीप हे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमध्ये जेठालाल ही भूमिका साकारतात. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये दिशा वकानीबाबत सांगितलं, 'दिशाला शोमधून ब्रेक घेऊन पाच वर्ष झाली आहेत. ती शोमध्ये परत येणार की नाही? या प्रश्नाचं उत्तर प्रोडक्शन हाऊस तुम्हाला देऊ शकते. मी त्याबद्दल काहीही सांगू शकत नाही. मला या गोष्टीचा आनंद वाटतो की, दया शोमध्ये नसताना देखील प्रेक्षक हे या मालिकेला पसंती देत आहेत. '
निर्मात्यांनी दिली होती माहिती
काही दिवसांपूर्वी असित मोदी यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं की, ' 2020 आणि 2021 हा अनेकांसाठी कठिण काळ होता. पण आता 2022 मध्ये चांगल्या काळाची सुरूवात झाली आहे. आता लवकरच दया तुमच्या भेटीस येणार आहे. आता प्रेक्षक पुन्हा दया आणि जेठालालची जोडी पाहू शकणार आहेत.
दिशानं 2017 मध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाच वर्ष तिचे चाहते ती या शोमध्ये परत येण्याची वाट पाहात होते. पण दिशानं अजून शोमध्ये पुनरागमन केलेलं नाही.
28 जुलै 2008 रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
संबंधित बातम्या
- Happy Birthday Dilip Joshi : कधीकाळी 50 रुपये मानधन घेणारे दिलीप जोशी आज आहेत कोट्यवधींचे मालक; एका एपिसोडसाठी घेतात एवढे मानधन
- Heropanti 2 : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर टायगर श्रॉफचा 'हीरोपंती 2' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
- BE Rojgaar : तीन बेरोजगारांची गोष्ट; ‘BE Rojgaar’ चा पहिला एपिसोड पाहिलात?