Dipika Chikhlia : छोट्या पडद्यावरील 'सीते'वर कोसळला दु:खाचा डोंगर, घरातील सदस्याचे झाले निधन
Dipika Chikhlia : दीपिकाच्या घरातील वातावरण शोकाकूल झाले आहे. अभिनेत्रीने स्वत: सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे.
दीपिकाने शेअर केली भावूक पोस्ट
दीपिकाने आपल्या श्वानाचे फोटो शेअर करत लिहिले की, 'मोठे हृदय असलेल्या आमच्या गोल्डन बॉयने 13 वर्ष सोबत केली. तो आमच्यासाठी एक आनंद देणारा सदस्य होता. तो एका देवदूतासारखाच होता, असे दीपिकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. आता गोल्डन बॉय खऱ्या अर्थाने देवदूत झाला. आम्ही आशा करतो की तुमच्या आत्म्याला शांती लाभो, व्हिस्कू! असेही दीपिकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेला दिसली होती दीपिका
दीपिकाने काही दिवसांपूर्वी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापणा अभिषेक सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी 'रामायण' मालिकेतील रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लाहिरी आदी उपस्थित होते. या तिघांनी मिळून 'हमारे राम आयेंगे' नावाचा म्युझिक अल्बमही शूट केला.
View this post on Instagram
दीपिकाची नवी मालिका
सध्या अभिनेत्री दीपिका चिखलिया तिच्या 'धरतीपुत्र नंदिनी' या नवीन शोमध्ये व्यस्त आहे. या फॅमिली ड्रामामध्ये दीपिका महत्त्वाची भूमिका साकारत असून ती या शोची निर्मितीही करत आहे.
'गालिब'चित्रपटातील भूमिकेवर प्रेक्षकांची नाराजी
काही वर्षांपूर्वी दीपिका चिखलियाने 'गालिब' चित्रपटात दहशतवाद्याच्या पत्नीची भूमिका साकारली होती. ती दहशतवादी अफजल गुरूची पत्नी आणि गालिबची आई बनली. 'रामायण'मधील 'सीता' दहशतवाद्याची पत्नी बनताना पाहून चाहत्यांना हे पचनी पडलं नाही आणि त्यांनी दीपिकावर टीका करण्यास सुरुवात केली. यामुळे तिला खूप ट्रोल करण्यात आले.
दीपिकाने चित्रपटातही साकारली आहे भूमिका
दीपिका चिखलिया आतापर्यंत 'सुन मेरी लैला', 'विक्रम बेताल', 'भगवान दादा', 'घर संसार', 'इंद्रजीत', 'घर का चिराग' यांसारख्या अनेक हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये दिसली आहे. दीपिका सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. इन्स्टावर 8 लाख 41 हजार लोक त्याला फॉलो करतात.