एक्स्प्लोर

अक्षय, तुझ्या मुलीला कोणी 'ती' कमेंट केली तर? : मल्लिका

'अक्षय कुमारच्या मुलीला कोणी मजेत म्हटलं, नितारा जी, आप बेल बजाईये, मै आपकी बजाता हू' तर त्याच्या पचनी पडेल का?' असं मल्लिकाने ठामपणे विचारलं आहे.

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारने 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'च्या मंचावर केलेली कमेंट सहपरीक्षक मल्लिका दुआला रुचलेली नाही. अक्षयच्या मुलीला कोणी 'तशा' प्रकारे कमेंट केली तर त्याला रुचेल का? असा सवाल तिने केला. मोठ्या सेलिब्रेटींना 'चार्म' आणि 'हार्म' मधला फरक कळत नाही, असं म्हणत मल्लिकाने संताप व्यक्त केला आहे. अक्षय हे फक्त उदाहरण आहे, पण इतर अनेक सेलिब्रेटींना याचं भान नसल्याचं मल्लिका म्हणाली. जे-जे सेलिब्रेटींना आपल्या महिला सहकाऱ्याला तिच्या संमतीविना कवटाळतात, त्यांना हा सवाल असल्याचं ती म्हणाली. मल्लिकाने एक खुलं पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'अक्षय कुमारच्या मुलीला कोणी मजेत म्हटलं, नितारा जी, आप बेल बजाईये, मै आपकी बजाता हू' तर त्याच्या पचनी पडेल का?' असं मल्लिकाने ठामपणे विचारलं आहे. https://twitter.com/MallikaDua/status/923529077209776130 'महिला असो वा पुरुष. हेतूपुरस्पर किंवा चुकून. कामाच्या ठिकाणी एटिकेट्स न पाळणाऱ्या सर्वांसाठी हे आहे. तुमच्यामुळे एखाद्याला कामाच्या ठिकाणी अवघडल्यासारखं होता कामा नये. प्रोफेशनल कम्युनिकेशनचं भान प्रत्येकानं बाळगावं' असं मल्लिका दुआ म्हणते. https://twitter.com/MallikaDua/status/923517016647942144 'मल्लिकाजी आप बेल बजाईये, मै आपकी बजाता हू' असं अक्षय कॉमेडी शोच्या सेटवर म्हणाला होता. हा भाग चॅनेलने प्रक्षेपित केला नाही, मात्र अक्षयच्या टिपणीचं वृत्त सोशल मीडियवर पसरलं आणि मल्लिका दुआसह तिचे चाहतेही नाराज झाले. https://twitter.com/MallikaDua/status/923516926592139266 https://twitter.com/MallikaDua/status/923513481567002624 'बेल वाजवणं' हा 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' मध्ये स्पर्धकाचं कौतुक करण्याचा प्रकार आहे. सुपरजज अक्षयने जज मल्लिकाला स्पर्धकाचं कौतुक करण्यास सांगताना ही कमेंट केली. https://twitter.com/MallikaDua/status/923419677488848896 मल्लिका प्रमाणेच तिचे वडील, ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआही संतापले आहेत. त्यांनी फेसबुकवर आपला राग व्यक्त केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Pune Car Accindet Case :2 निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हायला हवी होतीAditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोपSpecial Report Bangladeshi : मुंबईत नेमके किती बांगलादेशी? चालू वर्षात 177 बांगलादेशींना अटकTop 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget