Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर पसरली जादुई हवा; 'या' जादूगारांची जादू पाहून आश्चर्यचकित व्हाल!
अक्षय लक्ष्मण (Akshay Laxman), मधुगंधा इंद्रजीत (Madhugandha Indrajeet), केदार परुळेकर (Kedar Parulekar), जितेंद्र रघुवीर (Jitendra Raghuvir) यांनी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात हजेरी लावली.
Chala Hawa Yeu Dya: छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या शोमध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. नुकतीच काही जादूगारांनी या शोमध्ये हजेरी लवाली. अक्षय लक्ष्मण (Akshay Laxman), मधुगंधा इंद्रजीत (Madhugandha Indrajeet), केदार परुळेकर (Kedar Parulekar), जितेंद्र रघुवीर (Jitendra Raghuvir) यांनी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात हजेरी लावली. या जादूगारांनी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये काही जादूचे प्रयोग सादर केले.
नुकताच चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जादूगार जितेंद्र रघुवीर हे मंचावर एक जादू सादर करताना दिसत आहेत. यावेळी चला हवा येऊ द्या शोमधील अभिनेत्री श्रेया बुगडे मंचावर येते आणि एका बॉक्समध्ये बसते. त्यानंतर जितेंद्र रघुवीर म्हणतात की, 'हे तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी विसरु शकणार नाही' जितेंद्र रघुवीर अशी एक जादू करतात की, ती पाहून उपस्थित असलेले सर्वच जण आश्चर्यचकित होतात. प्रेक्षकांमध्ये बसलेले भारत गणेशपुरे आणि निलेश साबळे हे देखील जितेंद्र रघुवीर यांची जादू पाहून आश्चर्यचकित होतात.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
भारत गणेशपुरे, निलेश साबळे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके हे कलाकार 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामध्ये विविध स्किट सादर करत असतात. निलेश साबळे हा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या मालिकांची तसेच चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी येत असते. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 'चला हवा येऊ द्या' च्या गेल्या एपिसोडमध्ये काही पत्रकारांनी हजेरी लावली होती. विविध क्षेत्रातील व्यक्ती 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात हजेरी लावत असतात. तसेच काही राजकारणी देखील या कार्यक्रमामध्ये हजेरी लावत असतात. 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम प्रेक्षक सोमवार आणि मंगळवार रात्री 9.30 वाजता बघू शकतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Chala Hawa Yeu Dya : थुकरटवाडीत पत्रकारांची एन्ट्री; 'चला हवा येऊ द्या टीम'ची धमाल मस्ती