Chala Hawa Yeu Dya : थुकरटवाडीत पत्रकारांची एन्ट्री; 'चला हवा येऊ द्या टीम'ची धमाल मस्ती
Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात रणवीर सिंहने राजीव खांडेकरांचा लूक कॉपी केला असल्याचं म्हटलं आहे.
Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या लोकप्रिय कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी सहभागी झाले होते. एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, निलेश खरे, मिलिंद भागवत अशा अनेक मंडळींनी या कार्यक्रमात हजेरी लावली. दरम्यान निलेश साबळेच्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. निलेश साबळेने राजीव खांडेकर यांचा एक लूक शेअर केला. या लूकमध्ये राजीव खांडेकरांच्या पिळदार मिशा आणि पोनी बांधलेली दिसत आहे. हा लूक शेअर करत निलेश साबळे म्हणाला की, रणवीर सिंहने राजीव खांडेकरांचा लूक कॉपी केला आहे.
रणवीर सिंहने लूक कॉपी केल्याबद्दल राजीव खांडेकर म्हणाले,"मी माझा लूक याचसाठी बदलला कारण मला माहीत होतं की मला कधीतरी या मंचावर यायचं आहे. त्यावेळी रोहित शेट्टीदेखील असतील आणि ते मला सिनेमाची ऑफर देतील आणि मी सिनेसृष्टीत पदार्पण केलं तर मराठी पत्रकारितेचं कसं होणार? सिनेमासाठी विचारणा होऊ नये आणि मराठी पत्रकारिता वाचावी यासाठी मी लूक बदलला".
View this post on Instagram
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे महत्त्व सांगणाऱ्या पत्राने वेधलं लक्ष
'चला हवा येऊ द्या'च्या नुकत्याच पार पडलेल्या भागात श्रेया बुगडेने पोस्टमन काकांची जागा घेत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचं महत्त्व सांगणारं हे पत्र वाचलं. या पत्राने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. तिने म्हटलं,"पुढे अचानक टीव्ही आला, टीव्हीवरच्या बातम्या आल्या...24 तास...हे खायचं काम नव्हतं. खूप कष्ट होती. पण,दुर्दैवाने चांगल्या गोष्टींसोबत वाईट गोष्टी आल्या. विश्वास ढासळायला आणि चौथा स्तंभ कोसळायला सुरू होत आहे की काय असं वाटू लागलं".
श्रेया पुढे म्हणतेय,"पत्रकारिता म्हणजे फक्त जॅकेट आणि पॅकेट एवढीच उरली आहे का असं वाटू लागलं. पण काही माणसं खंबीर होती. त्यांच्या शब्दाला किंमत होती. वाकायला सांगितलं की रांगायला लागणारे लोक भोवती असताना कणखर भूमिका घेणारे मोजके पत्रकार टिकून आहेत आणि ही या देशासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पत्रकार मंडळी नेत्यांना, अधिकार मंडळींना त्यांच्या चुका दाखवत असतात. पत्रकार आरसा दाखवणारे असतात".
संबंधित बातम्या