Jahnavi Killekar: "...म्हणूनच मी 9 लाख घेतले, नसते घेतले तर..."; अखेर जान्हवी किल्लेकरनं सांगितलं 'ती' पैशांची बॅग उचलण्याचं कारण
Jahnavi Killekar: जान्हवीनं बिग बॉसनं दिलेली 9 लाखांची बॅग उचलली आणि सर्वात आधी घरातून बाहेर पडली. फिनालेची सांगता झाल्यानंतर जान्हवीच्या निर्णयाचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : मराठी टेलिव्हिजन विश्वातील (Marathi Television World) प्रसिद्ध रिअॅलिटी शो (Reality Show) बिग बॉस मराठीनं (Bigg Boss Marathi) नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. यंदाच्या पर्वाची ट्रॉफी झापुक झुपुक फेम सूरज चव्हाणनं उंचावली. तर रनरअप ठरला इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वाचा विजेता अभिजीत सावंत. बिग बॉस मराठीच्या सर्वच स्पर्धकांची जोरदार चर्चा रंगली आहे. पण, त्यातल्या त्यात त्यांचं मानधन, त्यांना मिळालेली बक्षिसाची रक्कम याबाबतही तुफान चर्चा होत आहेत. अशातच बिग बॉसच्या ग्रँड फिनालेच्या दिवशी घरातून सर्वात आधी बाहेर आलेल्या जान्हवी किल्लेकर चर्चेचा विषय ठरत आहे. जान्हवीनं बिग बॉसनं दिलेली 9 लाखांची बॅग उचलली आणि सर्वात आधी घरातून बाहेर पडली. फिनालेची सांगता झाल्यानंतर जान्हवीच्या निर्णयाचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
ग्रँड फिनालेच्या दिवशी बिग बॉसनं 6 फायनलिस्टना एक ऑफर दिली होती. सात लाख रुपयांनी भरलेली बॅग बिग बॉसनी स्पर्धकांसमोर ठेवली होती. बझर वाजवून कोणीही ती बॅग उचलून थेट घराबाहेर जाऊ शकतं, असं बिग बॉसनी सांगितलं होतं. पण कुणीच पुढे आलं नाही. त्यानंतर बिग बॉसनी ती रक्कम दोन लाखांनी वाढवली आणि 9 लाख केली आणि स्पर्धकांना पुन्हा एकदा ऑफर दिली. सुरुवातीला सर्व स्पर्धक मोठ्या पेचात सापडल्याचं दिसलं. पण जान्हवीनं विचार केला आणि थेट पुढे येऊन बझर वाजवलं. ती 9 लाखांची बॅग उचलली आणि घराबाहेर येण्याचा पर्याय निवडला. पण तिनं असं का केलं? काय विचार करून तिनं बॅग उचलली? याबाबत अनेक प्रश्न चाहत्यांमध्ये चर्चेत होते. आता याच प्रश्नांना खुद्द जान्हवी किल्लेकरनं उत्तर दिलं आहे.
जर मी त्यावेळी बॅग उचलली नसती, तर...
जान्हवी किल्लेकरनं बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर 'मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंट'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत जान्हवीला 9 लाख रुपये घेऊन घराबाहेर येण्याच्या निर्णयाबाबत विचारलं त्यावेळी तिनं सांगितलं की, "मी पैशांची बॅग घेतली. मला वाईट वाटत होतं. पण जेव्हा रितेश सरांनी एन्व्हलप उघडलं आणि सांगितलं की, जान्हवी तुमचंच नाव आहे. त्यावेळी माझ्या जीवात जीव आला. मी योग्य निर्णय घेतल्यामुळे बरं वाटलं. जर मी त्यावेळी बॅग उचलली नसती, तर मी बाहेर जाणार होते, त्यामुळे माझ्या हातात शून्य राहिलं असतं. जर मी ते पैसे घेतले नसते, तर मला अपराधी वाटलं असतं. बिग बॉसनं संधी दिली होती. पैसे चोरी करायचे नव्हते. सगळ्या सदस्यांच्या हक्काचे पैसे होते. बिग बॉसनं सगळ्यांना संधी दिली होती."
पुढे बोलताना जान्हवी म्हणाली की, "जेव्हा सात लाखांसाठी विचारलं तेव्हा मी विचार करत होते. मला वाटलं की, लोक मला पुन्हा ट्रोल करतील. पण खरं सांगू का? आम्ही आत जरी असलो तरी दिसत होतं की, टॉप 3 कोण असणार. मला वाटतं होतं की, आतापर्यंत लक्षात राहिले लोकांच्या, जाता-जातादेखील लोकांच्या लक्षात राहिलं पाहिजं. वेगळं काय करू शकते का? हा विचार माझ्या डोक्यात सुरू होता. टॉप 3 मला माहीत आहे, चौथी येऊन काय करणार आहे? काय मिळणार आहे? तर मी विचार केला आणि बॅग उचलली. बझर दाबला आणि कारणही सांगितलं. ते कारणदेखील अगदी खरं होतं. चुका खूप झाल्या आहेत, त्यामुळे इतक्या लवकर महाराष्ट्र माफ करणार नाही. त्यांच्याकडून अशी अपेक्षादेखील करू शकत नाही. कारण ते त्यांच्या जागी बरोबर आहेत. माझी चूक झाली आहे. थोडा वेळ जावा लागेल, त्या गोष्टीला. इतक्या पटकन काही होऊ शकत नाही. त्यामुळे बिग बॉसच्या घरात शेवटचं प्रायश्चित म्हणून मी माझं नाव शोमधून काढते, असं म्हणून मी बझर दाबला."
महत्त्वाच्या इतर बातम्या :