Bigg Boss Marathi Arbaz Patel Sangram Chougule : ''चल दोघं जाऊ बाहेर, मग दाखवतो''; 'बिग बॉस मराठी'च्या घरात होणार ताकदीचा सामना; अरबाज आणि संग्राम एकमेकांना भिडणार? पाहा व्हिडीओ
Bigg Boss Marathi Season 5 : वाईल्ड कार्ड एन्ट्रीनंतर संग्राम चौगुलेची चांगलीच चर्चा रंगली होती. आजच्या एपिसोडमध्ये संग्राम आणि अरबाज एकमेकांना भिडणार असल्याचे प्रोमोत दिसत आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi Season 5) आता सातवा आठवडा सुरू झाला आहे. बुधवारी प्रसारीत झालेल्या एपिसोडमध्ये घरात कॅप्टन्सीचा टास्क रंगला. टास्कच्या दोन फेऱ्या पार पडल्या असून ग्रुप ए ने आपल्या प़ॉवर गेम दाखवला असल्याचे दिसून आले. वाईल्ड कार्ड एन्ट्रीनंतर संग्राम चौगुलेची चांगलीच चर्चा रंगली होती. आजच्या एपिसोडमध्ये संग्राम आणि अरबाज एकमेकांना भिडणार असल्याचे प्रोमोत दिसत आहे.
गेल्या आठवड्यात घन:श्याम दराडे घराबाहेर गेला. त्यानंतर आता या शोमध्ये 'मिस्टर युनिव्हर्स', 'मिस्टर इंडिया' राहिलेल्या संग्राम चौगुलेची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. संग्रामच्या एन्ट्रीने बिग बॉस मराठीच्या खेळाला एक वेगळाच ट्विस्ट आला. आजच्या टास्कमध्ये संग्राम आणि अरबाजची जोरदार वादावादी होताना दिसत आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरात संग्राम चौगुलेची एन्ट्री झाल्यानंतर आता घरातील वातावरण बदलताना दिसत आहे. संग्रामने पहिल्याच दिवशी अरबाज आणि निक्कीबरोबर पंगा घेतला आहे. त्यामुळे निक्की आणि अरबाजने संग्रामविरोधात मोहीमच उघडली आहे. तर, संग्राम हा घरातील इतर सदस्यांबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे
समोर आलेल्या प्रोमोमध्ये संग्रामने टास्कमध्ये पुन्हा एकदा अरबाजसोबत पंगा घेतलेला दिसत आहे.'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रेक्षकांना ताकदीचा सामना पाहायला मिळेल. प्रोमोनुसार, ग्रुप बीच्या गेममुळे अरबाज आणि त्याच्या गटातील इतर सदस्य संतापलेले दिसून आले. अरबाज आपला संताप व्यक्त करत वैभववरही आरडाओरड करताना दिसला. माझा गेम मला खेळू द्या असे संतापाने अरबाज बोलताना दिसत आहे. तर दुसरीकडे संग्राम ही, ''येऊ द्या माझ्या अंगावर... बघूयात ना किती ताकद आहे, चल दोघं जाऊ बाहेर, मग दाखवतो, असे बोलताना दिसत आहे. अरबाज आणि संग्राम एकमेकांना भिडताना प्रोमोत दिसले आहे. अरबाज-संग्रामने केलेले ताकदीचा वापर पाहून घरातील वातावरण मात्र तापणार आहे.
View this post on Instagram
अरबाजसमोर संग्राम निष्प्रभ, प्रेक्षकांनी उडवली थट्टा...
बुधवारी प्रसारीत झालेल्या बिग बॉस मराठीच्या एपिसोडमध्ये टास्क दरम्यान अरबाज, वैभव आणि निक्कीने ताकद लावली असल्याचे दिसून आले. अरबाजने संग्रामला पकडून बाजूला नेले. सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एकाने कमेंट्स करत म्हटले की, 'संग्राम निस्ता नावालाच बॉडी बिल्डर आहे की काय' दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलं की, 'अरर! अरबाज ने धरलाय की चांगलाच. Hype तेवढीच करा जेवढी खरोखर असेल.'