Bigg Boss Marathi : 'निक्कीची जिरवली आता जान्हवीची बारी', अभिजीत आणि आर्याला फुल सपोर्ट; गुलीगत सूरजबद्दल नेटकरी म्हणाले...
Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या घरात आज दुसरं नॉमिनेशन पार पडणार आहे. या नॉमिनेशनमध्ये ट्वीस्टही पाहायला मिळणार आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) घरात अकराव्या दिवशी नॉमिनेशनचं कार्य पार पडणार आहे. यादरम्यान, घरात जेवण बनवायचे देखील वांदे होणार आहेत. बिग बॉसच्या घरातील समीकरण प्रत्येक आठवड्यात बदलताना पाहायला मिळतात, तसंच काहीसं यंदाच्या बिग बॉसमध्येही दिसत आहे. गेल्या आठवड्यात मैत्रिणी असणाऱ्या निक्की आणि जान्हवी आता एकमेकींच्या विरोधात असल्याचं दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात आज दुसरं नॉमिनेशन पार पडणार आहे. या नॉमिनेशनमध्ये ट्वीस्टही पाहायला मिळणार आहे.
बिग बॉसच्या घरात दुसरं नॉमिनेशन कार्य
निक्की, जान्हवी, अरबाज आणि वैभव यांनी पहिल्या आठवड्याचं नॉमिनेशन पूर्णपणे त्यांच्या बाजूने घेतलं आणि त्यांच्या ग्रुपमधील सदस्यांना वाचवलं. बिग बॉस मराठीचा पहिला आठवडा निक्की तांबोळीने गाजवला. निक्कीने वर्षा ताई, अंकिता आर्या यांच्याबरोबर वाद घातला. निक्कीने वर्षा ताईंचा अपमान केल्यामुळे नेटकरी भडकले होते. मात्र, निक्कीने वर्षा ताईंसोबत वापरलेल्या भाषेवरुन भाऊच्या धक्क्यावर रितेशने तिची चांगलीच शाळा घेतली. यानंतर नेटकऱ्यांकडून चांगल्या प्रतिक्रिया उमटल्या.
'निक्कीची जिरवली आता जान्हवीची बारी'
View this post on Instagram
अभिजीत आणि आर्याला फुल सपोर्ट
भाऊच्या धक्क्यावर निक्की तांबोळीला रितेशने दे धक्का दिल्यावर आता जान्हवीची बारी असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. बिग बॉस हा प्रेक्षकांचा आवडता शो आहे. बिग बॉस प्रेमी या शोबद्द्लच्या प्रतिक्रिया वारंवार व्यक्त करत असतात. गेल्या आठवड्यात नेटकऱ्यांनी निक्कीला धारेवर धरलं होतं, आता मात्र नेटकऱ्यांचा निशाना जान्हवीवर आहे. एका नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलंय, "गेल्या आठवड्यात निक्कीची चरबी जिरवली होती, या आठवड्याला जान्हवीची बारी आहे". दुसऱ्याने कमेंटमध्ये लिहिलंय, "जान्हवी वर्षा ताईंचं नाव घेऊन सेफ राहायला बघतेय, पण जनता आहे की वर्षा ताईंना वाचवायला". तिसऱ्याने लिहिलंय, "अभिजित, आर्या मस्त खेळत आहेत". तर अनेक नेटकरी सूरजला फूल सपोर्ट देताना दिसत आहेत.
गुलीगत सूरजबद्दल नेटकरी म्हणाले...
View this post on Instagram
बिग बॉसच्या घरात जेवण बनवायचे वांदे
बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये पॅडी-योगिता, निखिल-सूरज, वर्षा-जान्हवी, अरबाज-धनंजय, वैभव-इरिना, आर्या-अभिषेक, वर्षा-घन:श्याम अशा जोड्या बनलेल्या दिसत आहेत. घरातील सदस्यांनी अंडी, कांदा-बटाटा अशा अनेक गोष्टी कॉम्प्रोमाइज केलेल्या आहेत. अंडी, बटाटा आणि कांदे अशा अनेक गोष्टी 'बिग बॉस मराठी'च्या सदस्यांनी नॉमिनेट केल्याने घरात जेवण बनवायचे वांदे होणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :