एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात होणार जेवण बनवायचे वांदे; जान्हवी आणि निक्की आमने-सामने; या आठवड्यात कोण होणार नॉमिनेट?

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन अंकित सेफ झाली असली तरी इतर सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार असणार आहे.

मुंबई : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) नवीन सीझनमध्ये पहिल्या कॅप्टनची निवड झाली आहे. कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) हिला बिग बॉस मराठीच्या घरात पहिला कॅप्टन होण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे अंकिता या आठवड्यासाठी सेफ झाली असली तरी, घरातील इतर सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार असणार आहे. या आठवड्यात कोण नॉमिनेशनमध्ये जाणार याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. या आठवड्यात नॉमिनेशनसाठी बिग बॉसने वेगळा गेम आणला आहे. यावेळीचं नॉमिनेशन जोड्यांमध्ये होणार असल्याचं प्रोमोमधून दिसून येत आहे.

 बिग बॉसच्या घरात होणार जेवण बनवायचे वांदे

बिग बॉस मराठीचा नवीन सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. निक्कीने पहिला आठवड्यात धुरळा उडवला. बिग बॉसच्या घरात आणि बाहेरही सर्वत्र फक्त निक्कीचीच चर्चा पाहायला मिळाली. भाऊच्या धक्क्यावर  रितेश देशमुखने निक्कीला चांगलाच दे धक्का दिला आणि इतर स्पर्धकांना जाग केलं. पहिल्या आठवड्यात शांत राहिलेले घरातील सदस्य आता हात-पाय मारताना दिसत आहेत. घरात निक्की, जान्हवी, अरबाज आणि वैभवचा ग्रुप तयार झाला होता. छोटा पुढारीही यांच्यात सामील आहे. पण, आता यांच्यातही फूट पडली आहे. तर इतर सदस्यांचा एक ग्रुप तयार झाला आहे. 

जान्हवी आणि निक्की आमने-सामने

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

या आठवड्यात कोण होणार नॉमिनेट?

दुसऱ्याचं आठवड्यात बिग बॉसच्या घरातील चित्र पालटल्याचं दिसत आहे. निक्की आणि जान्हवी यांच्यात वाद झाला आहे, तर अरबाज आणि निक्कीचं वाजल्याचं दिसत आहे. आता तिसऱ्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात नेमकी कोणती समीकरणं पाहायला मिळतात, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो आऊट झाला आहे. घरातील सर्व सदस्यांनी मिळून चर्चेत नसणाऱ्या जोड्यांना नॉमिनेट करायचं आहे. आता यामध्ये बिग बॉसने मोठा ट्विस्टही आणला आहे. आता पुढे नेमकं काय होणार, यासाठी तुम्हाला आजचा भाग पाहावा लागणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉसच्या घरात जेवण बनवायचे वांदे होणार असल्याचं प्रोमोमधून दिसत आहे. या घरात ज्याची चर्चा आहे, त्याचा नंबर वरचा आहे. आपणा सर्वांना चर्चेत नसणाऱ्या जोड्यांना नॉमिनेट करायचं आहे. पण, यातही मोठा ट्वीस्ट असणार आहे. आता घरातील सदस्य कुणाला नॉमिनेट करणार आणि घरातील सदस्यांना जेवण मिळणार का, हे पाहण्यास प्रेक्षक आतुर झाले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget