विकेंडला अरबाज घरी गेला, आजपासून सुरू होणार नवा आठवडा, बिग बॉस कोणता धक्का देणार?
Bigg Boss Marathi Day 58 : सुरुवातीपासूनच स्ट्राँग समजल्या जाणाऱ्या अरबाजला प्रेक्षकांनी बाहेरचा रस्ता दाखवला. अशातच आजपासून सुरू होणाऱ्या नव्या आठवड्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
Bigg Boss Marathi Day 58 : 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi) नवा सीझन सुरू होऊन आठ आठवडे पूर्ण झाले आहेत. सीझननं नवव्या आठवड्यात प्रवेश केला आहे. गेले 57 दिवस सर्वच सदस्य प्रेक्षकांचं फुल ऑन मनोरंजन करत आहेत. आजच्या भागात 'बिग बॉस' घरातील सदस्यांसोबत संवाद साधताना दिसून येतील. गेल्या आठवड्यातल्या शनिवारी-रविवारी भाऊचा धक्का पार पडला. यंदाचा भाऊचा धक्का (Bhaucha Dhakka) जोरदार ठरला. शनिवारी बिग बॉसच्या घरात पत्रकारांच्या थेट प्रश्नांना घरातील सर्व सदस्यांनी सडेतोड उत्तरं दिली. तर, रविवारी बिग बॉसच्या घरातून अरबाज पटेल बाहेर पडला. सुरुवातीपासूनच स्ट्राँग समजल्या जाणाऱ्या अरबाज पटेल (Arbaz Patel) याला प्रेक्षकांनी बाहेरचा रस्ता दाखवला. अशातच आजपासून सुरू होणाऱ्या नव्या आठवड्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. यंदाच्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात काय राडा होणार? बिग बॉस काय धक्का देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
View this post on Instagram
आजपासून सुरू होणाऱ्या नव्या आठवड्याचा प्रोमो समोर झाला आहे. यंदाच्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात मोठा कल्ला पाहायला मिळणार आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये, 'बिग बॉस मराठी'च्या घरातील आठही सदस्य गार्डन एरियामध्ये जमलेले दिसत आहेत. दरम्यान, 'बिग बॉस' म्हणत आहेत, "हा सीझन खऱ्या अर्थानं ब्लॉकबस्टर सीझन ठरलाय". त्यानंतर घरातील सर्व सदस्य 'भाऊचा धक्का' या सुपरहिट गाण्यावर धमाल डान्स करताना दिसत आहेत. तेवढ्यात बिग बॉस म्हणतात.... आणि आता मला एक महत्त्वाची घोषणा करायची आहे... सर्व सदस्यांच्या तोंडावर पुन्हा बारा वाजतात... आता बिग बॉस काय धक्का देणार? या विचारानंच सदस्यांचं टेन्शन वाढल्याचं पाहायला मिळतंय.
'बिग बॉस' आज काय महत्त्वाची घोषणा करणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे. बिग बॉसच्या घोषणेनंतर सदस्यांना सुखद धक्का बसणार की, त्यांची चक् पुन्हा 360 अंश फिरणार हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.
अरबाज पटेल एलिमिनेट, निक्की एकटी पडणार?
बिग बॉसच्या घरात गेल्या आठवड्यासाठी अरबाज पटेल, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर आणि जान्हवी किल्लेकर हे कलाकार नॉमिनेट होते. यंदाच्या आठवड्यात रितेश देशमुख नसल्यामुळे बिग बॉसनी एलिमिनेशन प्रक्रिया पार पाडली. यामध्ये प्रत्येक सदस्यासमोर एक बॅग ठेवली होती. त्यामध्ये सेफ असं कार्ड ठेवण्यात आलं होतं. यामध्ये सूरज, जान्हवी आणि वर्षाताई हे तिघेजण सेफ झाले. पण निक्की आणि अरबाज डेंजर झोनमध्ये होते. यामध्ये अरबाजचा खेळ संपला असल्याचं बिग बॉसनं जाहीर केलं. त्यानंतर निक्की ओक्साबोक्सी रडताना दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून निक्की घरातल्यांना आता आम्ही दोघंच आहोत. आता तुम्ही तुमच्यामधल्यांना बाहेर काढणार, आम्ही दोघ सळोकी पळो करुन सोडू तुम्हाला असं बोलताना दिसत होती. पण अरबाज गेल्यामुळे निक्की आता एकटी पडणार की काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.