एक्स्प्लोर
Advertisement
'बिग बॉस मराठी'च्या घरातून नंदकिशोर चौगुले बाद
हुकूमशाहच्या टास्कमध्ये घरातील इतर सदस्यांना दिलेल्या वागणुकीमुळे नंदकिशोरने आधीच प्रेक्षकांचा रोष ओढवून घेतला होता.
मुंबई : 'बिग बॉस मराठी' च्या घरातून अभिनेता नंदकिशोर चौगुले बाद झाला आहे. रविवारी रात्री हा भाग प्रक्षेपित होणार आहे. बिग बॉसमध्ये नंदकिशोर वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून सहभागी झाला होता.
हुकूमशाहच्या टास्कमध्ये घरातील इतर सदस्यांना दिलेल्या वागणुकीमुळे नंदकिशोरने आधीच प्रेक्षकांचा रोष ओढवून घेतला होता. त्यानंतर 'बिग बॉस'च्या घरात तो पहिल्यांदाच नॉमिनेट झाला. मात्र पहिल्याच फटक्यात बाद झाल्यामुळे नंदकिशोरला प्रेक्षकांचा पाठिंबा नसल्याचं पाहायला मिळालं.
वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतलेल्या शर्मिष्ठा राऊत आणि नंदकिशोर चौगुले यांना बिग बॉसने गेल्या आठवड्यात कन्फेशन रुममध्ये बोलवून एक सिक्रेट टास्क दिला होता. नॉमिनेशन टास्कमध्ये सर्वाधिक मतं मिळवण्यासाठी इतर सदस्यांची समजूत घातली, तर नॉमिनेशन प्रक्रियेपासून सुरक्षित होण्याची संधी दोघांना होती.
बिग बॉसच्या म्हणण्यानुसार, शर्मिष्ठा आणि नंदकिशोर इतरांची सर्वाधिक मतं मिळवण्यात अयशस्वी तर ठरलेच, पण दोघांनी सदस्यांचं मन वळवण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे ते दोघंही थेट नॉमिनेट झाले, तर सर्वाधिक मतं मिळवून मेघा, सई आणि स्मिता असे पाच स्पर्धक यावेळी नॉमिनेट झाले होते.
सासू-सून-जावई टास्कमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवल्यामुळे मेघा, शर्मिष्ठा, नंदकिशोर आणि स्मिता यांची टीम विजयी झाली होती. कॅप्टनपदासाठी या टीममधील दोघांची निवड करायची होती. स्मिताला सर्वांनीच उमेदवारी दिली, मात्र इतर तिघंही जण स्वतःच्या नावासाठी अडून बसले होते. अखेर इतर सदस्यांच्या मतानुसार नंदकिशोरला उमेदवारी देण्यात आली.
'बिग बॉस'च्या घरात नंदकिशोरचा प्रवास चांगलाच वादग्रस्त राहिला होता. प्रवेश केल्यापासूनच त्याचे आऊ म्हणजेच उषा नाडकर्णींसोबत खटके उडाले होते. आऊला त्रास देण्यावरुन पुष्कर जोगसोबत त्याचा वादही झाला होता. हुकूमशाह टास्कमध्ये त्याने घरातील सदस्यांना दिलेल्या वागणुकीमुळे स्पर्धक, प्रेक्षक नाराज होते. सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनीही त्याला 'वीकेंडचा डाव'मध्ये झापलं होतं.
बिग बॉसच्या घरात आता सात स्पर्धक राहिले असून ग्रँड फिनालेसाठी दोनच आठवडे उरले आहेत. आतापर्यंत आरती सोळंकी, विनित बोंडे, अनिल थत्ते, राजेश शृंगारपुरे, ऋतुजा धर्माधिकारी (वैद्यकीय कारण), जुई गडकरी, सुशांत शेलार (वैद्यकीय कारण), त्यागराज खाडिलकर (वाईल्ड कार्ड), भूषण कडू, उषा नाडकर्णी, नंदकिशोर चौगुले (वाईल्ड कार्ड) हे 11 स्पर्धक घराबाहेर गेले आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला 15 स्पर्धक सहभागी झाले होते, तर तिघांना वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली.
मेघा धाडे, सई लोकूर, पुष्कर जोग, आस्ताद काळे, रेशम टिपणीस, स्मिता गोंदकर या सहा स्पर्धकांशिवाय वाईल्ड कार्ड एन्ट्रीने आलेली शर्मिष्ठा राऊत असे सात जण सध्या बिग बॉसच्या घरात आहेत.
संबंधित बातम्या :
'बिग बॉस मराठी'च्या विजेत्याला मिळणार...
म्हणून 'बिग बॉस'च्या घरात पुष्कर बिकीनीमध्ये फिरतोय
बिग बॉस मराठी : नंदकिशोरने मेघाला बुटावर नाक घासायला लावलं
बिग बॉस मराठी : पुनरागमनावर ऋतुजाची इन्स्टाग्राम पोस्ट
बिग बॉस : आस्ताद, मेघाला हरवत पुष्कर कर्णधार बनला
हे 'बिग बॉस मराठी'चं घर नाही, बस आहे...
बिग बॉस मराठी : अभिनेता सुशांत शेलार घराबाहेर
बर्थ डे स्पेशल : मेघा धाडेबद्दलच्या रंजक गोष्टी
'मराठी बिग बॉस'मध्ये आणखी एक वाईल्ड कार्ड एण्ट्री
बाहेर आल्यावर पहिल्यांदा बायकोला...... : राजेश शृंगारपुरे
राजेश शृंगारपुरे 'मराठी बिग बॉस'च्या घरातून बाहेर
बिग बॉसच्या घरातील हर्षदाच्या एन्ट्रीला भरभरुन प्रतिसाद
रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार
बिग बॉस मराठी : मेघा, आस्ताद किंवा राजेश जिंकतील : अनिल थत्ते
बिग बॉस मराठी : जुई गेमर, भूषणने इमेज बिघडवली : आरती
मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाला दमदार सुरुवात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बीड
Advertisement