एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 5 Winner : ठरलं! अभिजीत सावंत बिग बॉस मराठीचा विजेता? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Bigg Boss Marathi 5 Winner Name : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले 6 ऑक्टोबरला पडणार आहे. त्याआधीच विजेत्याचं नाव चर्चेत आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठी पाचव्या सीझनला धमाकेदार सुरुवात झाली, तेव्हापासून हा शो प्रचंड चर्चेत आहे. यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 100 दिवसांसाठी सुरु झालेला हा शो आता  70 दिवसांनी आटोपण्यात येणार आहे. बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन संपायला अवघे दोन आठवडे शिल्लक राहिले आहेत. आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी चाहते खूप प्रयत्न करताना दिसत आहे. यंदाच्या सीझनचा ग्रँड फिनाने पार पडण्याआधीच विजेत्याचं नाव चर्चेत आहे. 

अभिजीत सावंत बिग बॉस मराठीचा विजेता

बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi Winner) यंदाच्या सीझनचा विजेता लवकरच मिळणार आहे. बिग बॉसप्रेमी याची आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले (Bigg Boss Marathi Grand Finale)  6 ऑक्टोबरला पडणार आहे. त्याआधीच विजेत्याचं नाव चर्चेत आहे. अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पाचव्या सीझनचा विजेता असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या स्पर्धकांची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये स्पर्धकांची नाव आणि विजेता तसेच उपविजेला असा उल्लेख दिसत आहे. पाहता क्षणी ही विकीपीडियावर यादी असल्यासारखं भासत आहे. त्यामुळे ग्रँड फिनाले आधीच विजेत्याचं नाव समोर आल्याचं बोललं जात आहे.

सोशल मीडियावर चर्चेला उधाण

सोशल मीडियावर व्हायरल यादीनुसार, अभिजीत सावंत पाचव्या सीझनचा विजेता ठरणार असल्याचं बोललं जात आहे. तर अंकिता चव्हाण पहिली उपविजेता तर सूरज चव्हाण दुसरा उपविजेता ठरल्याचं यादीवरुन दिसत आहे. त्याशिवाय, जान्हवी तिसरी उपविजेती तर निक्की चौथी उपविजेती ठरल्याचं व्हायरल यादीमध्ये दिसत आहे. या अफवांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by मी एक सिंगल 😎 (@mi_ek_single)

बिग बॉस म्हणजे मनोरंजनाचा बॉस

बिग बॉस मराठीच्या यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे, मग ते स्पर्धकांमुळे असो किंवा मग, होस्ट रितेश देशमुख याच्यामुळे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या होस्टिंगची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख याच्या खांद्यावर देण्यात आली. त्यानंतर शोकडे मोठा प्रेक्षकवर्ग वळला आहे. यामुळेच यंदाचा सीझनने बिग बॉस मराठी आधीच्या सीझनच्या तुलनेत टीआरपीमध्ये बाजी मारली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Urmila Matondkar : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा घटस्फोट? लग्नाच्या 8 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

International Lottery Day : लॉटरीचा ट्रेंड पुन्हा वाढतोय! आतापर्यंत 13 राज्यांची मंजुरी; एका झटक्यात कोट्यधीश करणाऱ्या लॉटरीचा इतिहास काय? 
लॉटरीचा ट्रेंड पुन्हा वाढतोय! आतापर्यंत 13 राज्यांची मंजुरी; एका झटक्यात कोट्यधीश करणाऱ्या लॉटरीचा इतिहास काय? 
अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा
अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
Devendra Fadnavis In Kolhapur : तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Rain : मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP MajhaZero Hour on BJP Marathwada Mission | विदर्भ, मराठवाडा जिंकण्यासाठी भाजपची रणनीती? ABP MajhaZero Hour on Opposition Reaction : अमित शाहांच्या दौऱ्याला अर्थ नाही, मराठवाड्यात मविआची ताकद!Mumbai Rain School Holiday : मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर, दीपक केसरकरांची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
International Lottery Day : लॉटरीचा ट्रेंड पुन्हा वाढतोय! आतापर्यंत 13 राज्यांची मंजुरी; एका झटक्यात कोट्यधीश करणाऱ्या लॉटरीचा इतिहास काय? 
लॉटरीचा ट्रेंड पुन्हा वाढतोय! आतापर्यंत 13 राज्यांची मंजुरी; एका झटक्यात कोट्यधीश करणाऱ्या लॉटरीचा इतिहास काय? 
अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा
अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
Devendra Fadnavis In Kolhapur : तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
MLA Prakash Awade Joins BJP : आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश; ज्यांची शंका होती तेच दोघांना व्यासपीठावर घेऊन आले!
आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश; ज्यांची शंका होती तेच दोघांना व्यासपीठावर घेऊन आले!
Sharad pawar: मानवत मर्डर्स वेब सिरीजचं शरद पवार कनेक्शन; आशुतोष गोवारीकरांनी घेतली भेट
मानवत मर्डर्स वेब सिरीजचं शरद पवार कनेक्शन; आशुतोष गोवारीकरांनी घेतली भेट
Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सासरवाडीतील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सासरवाडीतील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला
झेनिथ धबधब्याजवळ वाहून गेली 22 वर्षीय तरुणी; कृष्णा व्हॅलीतील कुटुंबावर दु:खाचा डोंगर
झेनिथ धबधब्याजवळ वाहून गेली 22 वर्षीय तरुणी; कृष्णा व्हॅलीतील कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Embed widget