Bigg Boss Marathi 5 : जान्हवीच्या 'गळ्यात पडली' आर्या, अरबाजवर भडकला अभिजीत; फोटो चुलीत टाकून सदस्य होणार नॉमिनेशन
Bigg Boss Marathi 5 : नव्या सीझनमधील एका पेक्षा एक भन्नाट टास्क 'बिग बॉस प्रेमींचं' लक्ष वेधून घेत आहेत. आजच्या टास्कमध्येही कल्ला पाहायला मिळणार आहे.
![Bigg Boss Marathi 5 : जान्हवीच्या 'गळ्यात पडली' आर्या, अरबाजवर भडकला अभिजीत; फोटो चुलीत टाकून सदस्य होणार नॉमिनेशन Bigg Boss Marathi 5 Nomination task Arya Jadhao Photo in Jahnavi Killekar s neck Abhijeet Sawant Arbaaz Patel marathi news Bigg Boss Marathi 5 : जान्हवीच्या 'गळ्यात पडली' आर्या, अरबाजवर भडकला अभिजीत; फोटो चुलीत टाकून सदस्य होणार नॉमिनेशन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/22/4e37b323c9530c8b5380070e50620c081724297456186322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss Marathi New Season Day 26 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात आज नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे. या नॉमिनेशन टास्कमध्येही सदस्यांमध्ये राडा पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होऊन 25 दिवस पूर्ण झाले असले तरी सदस्यांमध्ये तेवढीच उर्जा आहे. प्रत्येक टास्कमध्ये सदस्य मेहनत घेताना दिसून येत आहेत. नव्या सीझनमधील एका पेक्षा एक भन्नाट टास्क 'बिग बॉस प्रेमींचं' लक्ष वेधून घेत आहेत. आजच्या टास्कमध्येही कल्ला पाहायला मिळणार आहे.
जान्हवीच्या गळ्यात आर्याचा फोटो
'बिग बॉस मराठी'च्या घरात आज नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. आजच्या नॉमिनेशन टास्कचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये, बिग बॉसच्या घरतील सदस्य आपल्या गळ्यातील सदस्याचा फोटो चुलीत टाकून योग्य कारण देत नॉमिनेट करताना दिसत आहेत. जान्हवीने आर्याचा फोटो गळ्यात टाकला असून ती म्हणतेय, "हिचा फोटो गळ्यात टाकून फिरण्याची माझ्यावर वेळ आली आहे". दरम्यान, पॅडी अरबाजला म्हणतोय, "कॅप्टन झाल्यानंतरच सगळे नियम लक्षात येतात". तर अभिजीत म्हणतोय,"चुकीचं करतोयस...आज नाहीतर उद्या तुला हे भोगावंच लागेल".
बिग बॉस मराठीच्या घरात आज नॉमिनेशन टास्क
View this post on Instagram
निक्की तांबोळी नवीन कॅप्टन
निक्की तांबोळी बिग बॉस मराठीच्या घरातील नवीन कॅप्टन बनली आहे, त्यामुळे ती नॉमिनेशनपासून सुरक्षित झाली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातून आतापर्यंत पुरुषोत्तम पाटील, योगिता चव्हाण आणि निखिल दामले हे सदस्य बाहेर पडले आहेत. या आठवड्यात कोण बाहेर पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासाठीच घरात नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Bigg Boss Marathi : ट्रोलर्सच्या निशाण्यावर असणाऱ्या जान्हवीसाठी नवरा मैदानात, पॅडीबाबत वादग्रस्त वक्तव्याबाबत म्हणाला...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)