एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 5 : पॅडी म्हणतोय 'डबल ढोलकी', नेटकरी म्हणाले 'स्पाय'; पुणेकर निखिल दामलेचा नेमका गेम काय?

Nikhil Damale : बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्याच आठवड्यात राडा दिसून येत असल्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाचा डोस मिळाला आहे.

मुंबई : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5) नवं सीझन पहिल्याच आठवड्यापासून तुफान चर्चेत आलं आहे.  कलर्स मराठीच्या 'रमा राघव' या मालिकेत राघवची मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकणारा निखिल दामले (Nikhil Damle) आता 'बिग बॉस मराठी'च्या घरात धमाका करायला सज्ज झाला आहे. पुणेकर निखिल दामले याने आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे आणि आता 'बिग बॉस'च्या घरात तो वेगळ्या अंदाजात मनोरंजन करताना दिसत आहे.

बिग बॉसच्या घरात भांडण तर दुसरीकडे गॉसिप

बिग बॉस मराठीच्या घरात एकीकडे भांडण तर दुसरीकडे गॉसिप असं चित्र दिसत आहे. पहिल्याच आठवड्यापासून बिग बॉसच्या घरात ग्रुप बनताना दिसत आहे. पण, हा ग्रुप बनण्याआधीच या ग्रुपमध्ये भांडणं सुरु झाली आहे. कोण कुणाच्या बाजूने बोलतंय, तर कोण कुणाला जाऊन सांगतोय.  बिग बॉसच्या घरामधील सद्यपरिस्थिती पाहता बिग बॉस मराठीच्या घरातील स्पाय कोण आहेत, ते हळूहळू समोर येताना दिसत आहेत.

बिग बॉसच्या घरातील स्पाय कोण?

बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोमध्ये आर्याबद्दल गॉसिप होताना दिसत आहे. पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी आर्याबद्दल बोलताना दिसत आहे. आर्याच्या वागण्यावर अभिजीत आणि पॅडी यांच्यात चर्चा सुरु असताना तिथे  सूरज आणि घनश्यामही बसलेले असतात. यावेळी पॅडी म्हणतो की, "तिने आजपण उडी घातली आणि त्यानंतर आपल्याला येऊन सांगते". यावर अभिजीत म्हणतो, "ग्रुप बनवू असं तू आम्हाला सांगायला येत असशील, तर विनंती कर." त्यावर पॅडी पुढे सांगतो की, त्याला आर्या आणि निखिल बिग बॉसच्या घरातील स्पाय वाटत आहेत. 

पुणेकर निखिल दामलेबद्दल नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nikhil Damle (@nikhil_damle)

दुसऱ्या एका प्रोमोमध्ये निक्की सोबत भांडणानंतर आर्या घरातील इतर सदस्यांना ग्रुप बनवू असं सांगत असते. यावेळी निखिल दामले अरबाज आणि वैभवला आतमध्ये काय सुरु आहे, हे सांगताना दिसत आहे. दरम्यान, यानंतर निखिल दामले 'डबल ढोलकी' असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. पॅडीला निखिल स्पाय वाटत आहे, तर नेटकऱ्यांनी त्याला 'डबल ढोलकी' टॅग दिला आहे. याशिवाय याआधी अभिजीत सावंतलाही नेटकऱ्यांनी 'डबल ढोलकी' म्हटलं आहे. 

'डबल ढोलकी' की 'स्पाय'?

बिग बॉसच्या घरातील प्रत्येक अपडेटवर नेटकरी कमेंट करुन प्रतिक्रिया देताना दिसत आहे. काहींनी निखिल दामले 'डबल ढोलकी'असल्याचं म्हटलं आहेत. एकाने कमेंट करत लिहिलंय, निखिल दामले ❌ निखिल चोमडे ✅. दुसऱ्याने लिहिलंय, अभिजित आणि निखिल अल्ट्रा प्रो मॅक्स डबल ढोलकी आहेत. आणखी एकाने लिहिलंय, "सांगतोय पण स्वत:च तुम्हाला वाटेल मी डबल ढोलकी आहे. आहेस तर त्याच वाटायचं काय, चुगलीखोर काका" 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : छोटा पुढारीने घेतली फिरकी अन् लाजेने लाल झाली निक्की, 'बिग बॉस'च्या घरात नेमकं काय झालं?

महत्त्वाच्या बातम्या

Swara Bhasker Hospitalised: 'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
Gashmeer Mahajani Post Viral: 'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
Nana Patekar Comment On Madhuri Dixit: 'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, नेमकं काय घडलं?
'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, अन्...
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget