छोटा पुढारीने घेतली फिरकी अन् लाजेने लाल झाली निक्की, 'बिग बॉस'च्या घरात नेमकं काय झालं?
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात प्रेमाचा चहा उतू चालला आहे. निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यातील केमिस्ट्री दिसून येत आहे.
![छोटा पुढारीने घेतली फिरकी अन् लाजेने लाल झाली निक्की, 'बिग बॉस'च्या घरात नेमकं काय झालं? Bigg Boss Marathi New Season Nikki Tamboli Arbaz Patel Bluming love Story bigg boss marathi 5 chota pudhari Ghanshyam Darode funny Video Viral marathi news छोटा पुढारीने घेतली फिरकी अन् लाजेने लाल झाली निक्की, 'बिग बॉस'च्या घरात नेमकं काय झालं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/02/152d15ce87c54d6603f23c78363e40ac1722596451589322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5) घरात पहिल्याच आठवड्यात फूल ऑन ड्रामा पाहायला मिळत आहे. एकीकडे निक्की तांबोळी (Nikki Tamboli) हिने सर्व घर डोक्यावर घेतल्याचं दिसत आहे. आधी वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar), नंतर अंकिता (Ankita Walavalkar) आणि आता आर्या (Arya Jadhav) यांच्यासोबत निक्कीने राडा केल्याचं दिसत आहेत. बिग बॉसच्या घरात हा सर्व राडा सुरु असताना दुसरीकडे प्रेमाचं वारंही पाहायला मिळत आहे. निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल (Nikki Tamboli and Arbaz Patel) यांच्यातील केमिस्ट्री बिग बॉसच्या घरात दिसून येत आहे.
बिग बॉसच्या घरात प्रेमाचं वारं
बिग बॉस मराठीच्या ग्रँड प्रीमियरमध्ये निक्की तांबोळी अरबाज पटेलवर फिदा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता बिग बॉसच्या घरातही यांच्यातील मैत्री खुलताना दिसत आहे. अरबाज आणि निक्की कायम एकत्र दिसतात. याविषयाच छोटा पुढारीने लक्ष घातल्याचं दिसत आहे. यावरुन छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडेने फिरकी घेतली आणि निक्की लाजेने लाल-लाल झाली. याचा प्रोमोही बिग बॉसने शेअर केला होता.
छोटा पुढारीने घेतली फिरकी अन् लाजेने लाल झाली निक्की,
बिग बॉस मराठीच्या घरात प्रेमाचा चहा उतू चाललाय. बिग बॉसच्या एका प्रोमोमध्ये दिसत आहे की, निक्की चहा बनवत असते, त्यावेळी हिटर चालत नाही. तेव्हा निक्की छोटा पुढारीला म्हणते, बिग बॉसला सांगून हे चालू करुन घे, त्यावर धनश्याम म्हणतो, बिग बॉस आमच्या वहिनीचं तरी ऐका. यावेळी घनश्यामच्या बाजूलाच असलेला अरबाज म्हणतो, थांब रे, सकाळी-सकाळी काय म्हणतो तू. यानंतर धनश्याम म्हणतो, तुमचं प्रेम उतू गेलेलं चालतं, मग आमचा चहा उतू गेला तर काय बिघडलं. यावरुन घरात हशा पिकला. यामुळे बिग बॉसच्या घरात एकीकडे राडा आणि दुसरीकडे प्रेमाचं वारं अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
"बिग बॉस आमच्या वहिनीचं तरी ऐका"
View this post on Instagram
'बिग बॉस'च्या घरात नेमकं काय झालं?
बिग बॉस मराठीच्या ग्रँड प्रीमियरपासूनच निक्की आणि अरबाज यांची चर्चा सुरु झाली आहे. ग्रँड प्रीमियरमध्ये निक्की अरबाजला पाहून लाजताना दिसली होती. आमच्या काहीतरी होऊ शकतं, असंही निक्कीने म्हटलं होतं. तर दुसरीकडे, आता निक्कीला सगळीकडे मीच दिसणार, माझ्याशिवाय तिला काही सुचणार नाही, असं अरबाजनंही म्हटलं होतं. याआधीच्या बिग बॉसच्या सीझनमध्ये काही लव्ह स्टोरीही उमलताना पाहायला मिळाल्या आहेत. आता निक्की आणि अरबाजची जोडी जमणार का, हे पाहावं लागणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Nikki Tamboli : "तंगड्या वर करुन कॅमेऱ्यासमोर झोपते", निक्कीकडून वर्षा उसगांवकरांचा अपमान; रितेश काय भूमिका घेणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)