Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरात दिवाळीनिमित्त आज कुणीतरी येणार..
Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेल्या साप्ताहिक टास्कमुळे बर्याच सदस्यांमध्ये मतभेद, भांडण होतं आहे. दिवाळीनिमित्त बिग बॉसच्या घरात आज अवधूत गुप्ते येणार आहे.
Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या साप्ताहिक टास्कदरम्यान झालेल्या धक्काबुक्कीमुळे बिग बॉस यांनी विशाल, विकास, जय आणि उत्कर्षला टास्कमधून बाद केले आणि उर्वरित सदस्यांसोबत कार्य पुढे सुरू राहील अशी घोषणा केली. त्यामुळे आज टास्क कसे पुढे जाणार? कोणत्या सदस्यांमध्ये राडे होणार? हे कळेलच. तर दिवाळीनिमित्त बिग बॉसच्या घरात आज अवधूत गुप्ते येणार आहे. अवधूत गुप्ते आज सदस्यांना काही सल्ले देणार आहे. तर स्पर्धकांसाठी संगीताची मेजवाणीदेखील असणार आहे.
बिग बॉस मराठीच्या घरातील नाती प्रत्येक टास्कनंतर, टास्क दरम्यान बदलताना दिसत आहेत. उत्कर्ष, जय यांच्या बोलण्यावरून असे दिसून येते की त्यांना काही झाले तरी मीराला कॅप्टन होऊ द्यायचे नाही आहे. त्यासाठी ते दुसर्या कोणालाही पाठिंबा द्यायला तयार आहेत. याची कल्पना मीरालादेखील आहे. आज मीनल आणि उत्कर्षमध्ये यावरुन चर्चा होणार आहे. ज्यामध्ये मीनल त्याला सांगताना दिसणार आहे, तिला कॅप्टन होण्याची इच्छा आहे.
Kangana Ranaut Viral Video: भर कार्यक्रमात जेव्हा कंगनाने करण जोहरला इग्नोर केलं, पहा व्हिडीओ
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेल्या साप्ताहिक कार्यामुळे बर्याच सदस्यांमध्ये मतभेद, भांडण होतं आहे. या आठवड्यात जय मीरा - गायत्रीला आणि मीरा, गायत्री जयला बरंच काही बोलून गेले. ज्याबद्दल गायत्रीने तिचे मत उत्कर्षसमोर मांडले. बिग बॉसच्या चावडीमध्ये आलेल्या चुगलीनंतर आणि जयच्या वक्तव्यानंतर या चौघांमधील वाद वाढतच चालला आहे. कोणीच कमीपणा घ्यायला तयार नाहीये. उत्कर्ष त्याच्यापरीने गायत्री, मीरा आणि जयला समजावण्याचा प्रयत्न करतो आहे हे दिसून येतं आहे. आता या चौघांनंतर स्नेहा आणि तृप्ती देसाई यांच्यामध्ये देखील मतभेद होताना दिसून येत आहेत. नक्की असे काय घडले ? कोणत्या विषयावरून, कोणावरून नक्की हे घडलं याच्यामागचं नेमकं कारण आजच्या भागामध्ये कळेलच.
Sooryavanshi: रोहीत शेट्टीच्या 'या' चित्रपटांनी दिवाळीत केला होता धमाका! यंदाही तोच प्लॅन
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टन्सी मिळणे हे अत्यंत महत्वाचे असते. कारण कॅप्टन्सीसोबत सदस्यांना एका आठवड्याची सुरक्षितता मिळते. ही सुरक्षितता अत्यंत महत्वाची असते हे आता घरातील सदस्यांना कळून चुकले आहे. त्यामुळे आता सदस्य कॅप्टन्सी मिळविण्यासाठी टास्कच्या आधी असो वा आठवड्याच्या सुरुवातीला असो डील करायला तयार होत आहेत. मीनलने काल टास्क सुरू होण्याआधीच मीराला डीलसाठी विचारले आहे. याबाबतीत नंतर विशाल, गायत्री आणि मीरामध्ये चर्चा झालेली दिसून आली.