(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sooryavanshi: रोहीत शेट्टीच्या 'या' चित्रपटांनी दिवाळीत केला होता धमाका! यंदाही तोच प्लॅन
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) चा सूर्यवंशी सिनेमा येत्या 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. याआधीदेखील रोहित शेट्टीचे अनेक सिनेमे दिवाळीत प्रदर्शित झाले होते.
Rohit Shetty Movies: रोहीत शेट्टीचा आगामी 'सूर्यवंशी' सिनेमा 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अक्षय कुमारसह कतरिना कैफदेखील मुख्य भूमिकेत असणार आहे. जगभरात सिनेमा उद्याच प्रदर्शित करण्यात येणार आहे. रोहीतने याआधीदेखील दिवाळीच्या मुहुर्तावर अनेक सिनेमे प्रदर्शित केले होते. त्याच्या दिवाळीत प्रदर्शित झालेल्या सर्वच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.
दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणाऱ्या सूर्यवंशी सिनेमाबद्दल चाहत्यांमध्येदेखील उत्सुकता आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफचा 'सूर्यवंशी' सिनेमा 5200 सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पहिल्याच दिवसाची चित्रपटाची कमाई 30 कोटींच्या आसपास असू शकते.
गोलमाल अगेन (Golmal Again)
रोहीत शेट्टीचा गोलमाल अगेन सिनेमा दिवाळीच्या मुहुर्तावर 20 ऑक्टोबर 2017 सालात प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अजय देवगन मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता.
गोलमाल 3 (Golmal 3)
रोहीतचा गोलमाल 3 (Golmal 3) सिनेमा 5 नोव्हेंबर 2010 साली दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमात अजय देवगन, अशरद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू, करीना कपूर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 108 कोटींची कमाई केली होती.
ऑल दी बेस्ट (All The Best)
ऑल दी बेस्ट हा रोहित शेट्टीचा सिनेमादेखील दिवाळीच्या मुहुर्तावर 16 ऑक्टोबर 2009 सालात प्रदर्शित झाला होता. अजय देवगन आणि फरदीन खानच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 40 कोटी रुपयांची कमाई केली होती.
गोलमाल रिटर्न्स (Golmaal Returns)
गोलमाल सीरिजमधील गोलमाल रिटर्न सिनेमादेखील दिवाळीत 29 ऑक्टोबर 2008 साली प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 50 कोटी रुपयांची कमाई केली होती.
View this post on Instagram
सूर्यवंशी (Sooryavanshi)
रोहीत शेट्टी यंदाच्या दिवाळीत सूर्यवंशी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे. सूर्यवंशी सिनेमा भारतातील 4000 पेक्षा अधिक सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. रोहीत शेट्टीचा सूर्यवंशी सिनेमादेखील बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालण्यासाठी सज्ज आहे.