Bigg Boss 18 : अविनाश मिश्राला घरातल्यांनी एकटं पाडलं, पण भाईजाननं सावरलं; सगळ्यांना झाप झाप झापलं
Bigg Boss 18 Weekend ka War : अविनाशवरील गंभीर आरोपांनंतर सलमान खान 'वीकेंड का वार'मध्ये घरातील सदस्यांना झापताना दिसणार आहे.
Salman Khan Weekend ka War : बिग बॉस सीझन 18 सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात या आठवड्यात घरातस तुफान राडे पाहायला मिळाले. अविनाश मिश्राला घरातील सदस्यांनी एलिमिनेट केल्यानंतर पुन्हा घरात एन्ट्री दिली. घरवापसी केल्यानंतर अविनाश मिश्राला घरातील जेलमध्ये ठेवण्यात आलं. यावेळी त्याला घरातील सदस्यांच्या राशनवर नियंत्रण ठेवण्याची पॉवर देण्यात आली.
सलमान खानचा अविनाश मिश्राला पाठिंबा
बिग बॉसच्या घरातील सदस्यांना त्याच्यावर जे गंभीर आरोप लावण्यात आले, त्याप्रकरणी माफी मागायला सांगितली. यानंतरही सदस्यांनी त्याची माफी मागितली नाही. याशिवाय, भांडण सुरु करणाऱ्या रजत आणि करणवीर यांनी त्याच्याशी बोलणंही टाळलं. अविनाशवरील गंभीर आरोपांनंतर सलमान खान 'वीकेंड का वार'मध्ये घरातील सदस्यांना झापताना दिसणार आहे.
बिग बॉसच्या घरातील सदस्यांना झापलं
आठवड्याच्या शेवटी बिग बॉस वीकेंड का वारमध्ये सलमान खान घरातील सदस्यांची शाळा घेत त्यांच्या चुका दाखवतो. आज सलमान खान अविनाश मिश्राला पाठिंबा देताना दिसणार आहे. अविनाश मिश्राच्या मु्द्द्यावरुन सलमान खान घरातील इतर सदस्यांना झापताना दिसणार आहे. प्रोफेशनच्या मुद्द्यावरुन सलमान अरफीन खानलाही प्रश्न विचारताना आणि सुनावताना दिसणार आहे. बिग बॉस 18 'वीकेंड का वार'चा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये सलमान खाळ घरातील सदस्यांना चुका दाखवताना दिसणार आहे.
View this post on Instagram
सलमान खान प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरातील सदस्यांना बोलत आहे की, "जर कुणावर इतका गंभीर आरोप केला जातो, तेव्हा त्यांच्या कुटुंबावर काय परिणाम होतो. त्यांना लोक कोणत्या नजरेने पाहत असतील की, बिग बॉसच्या घरातील सदस्य बोलतात तुमच्या मुलासोबत महिला सुरक्षित नाहीत. मला हे माहित आहे, कारण माझ्यावरही असे अनेक आरोप लावण्यात आले, त्यामुळे मला माहित आहे की, माझ्या आई-वडिलांना काय भोगावं लागलं आहे".
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :