Bigg Boss 18 : बिग बॉसच्या घरात जोरदार राडा, रजत दलालची विवियन डिसेनाला धमकी; म्हणाला, "तू फक्त..."
Bigg Boss Season 18 : बिग बॉसच्या घरात रजत दलालने विवियन डिसेनाला धमकी दिली. शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे.
Bigg Boss 18 Latest Update : बिग बॉस 18 शो सध्या प्रेक्षकांचं जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. काही सदस्यांमध्ये मैत्री होताना दिसत आहे, तर काही सदस्यांचे खटके उडताना दिसत आहे. सध्या विवियन डिसेना आणि रजत दलाल यांच्या गरमागरमीचं वाचावरण पाहायला मिळत आहे. रजत आणि विवियन यांच्या जेवणावरून वाद होताना पाहायला मिळणार आहे. या वादाचं रुपांतर जोरदार भांडणामध्ये होतं, ज्यानंतर रजत विवियनला धमकी देतो.
बिग बॉसच्या घरात जोरदार राडा
'बिग बॉस 18' सध्या घमासान पाहायला मिळत आहे. एकीकडे अविनाश मिश्रा आणि चुम दरांग यांच्यात कडाक्याचं भांडण पाहायला मिळालं. यावेळी चुम आणि अविनाश यांच्यातील वाद शांत करण्यात घरातील इतर सदस्यांच्या नाकी नऊ आले. यानंतर अविनाश मिश्राला 10 सदस्यांनी मिळून घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केलं. अविनाश मिश्रा घराबाहेर पडताना ईशा सिंहला अश्रू अनावर झाले. यानंतर घरात दुसरा राडा पाहायला मिळाला.
रजत दलालची विवियन डिसेनाला धमकी
एकीकडे घरच्यांनी अविनाश मिश्रा याला एलिमिनेट केलं. दुसरीकडे, आता विवियन डिसेना आणि रजत दलाल यांच्यात जेवणावरून कडाक्याचं भांडण पाहायला मिळणार आहे. दोघेही एकमेकांना धमकावताना दिसणार आहेत. बिग बॉस 18 च्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, "विवियन डिसेना खूप रागावलेला दिसत आहे आणि म्हणतो की, तो जेवण खाऊ शकतो. गॅस देखील चालू करू शकतो आणि कोणीही त्याला रोखू शकणार नाही".
रजतच्या धमकीनंतर काय म्हणाला विवियन?
यावर रजत म्हणतो की, "तू बोललास तु गॅस चालू करु शकतोस, तर तू गॅस चालू करुन दाखवं, मी हात चालवून दाखवेन. मी आतमध्ये असेन, तेव्हा एका वेळेचं जेवण थांबवेन". यावर विवियन हसत म्हणतो, "ठीक आहे, एका वेळेचही जेवण थांबवून दाखव, चल".
धमकीनंतर विवियन डिसेनाची प्रतिक्रिया काय?
Tomorrow Episode Promo: Rajat Dalal vs Vivian Dsena 🔥 pic.twitter.com/ri2vfi0cbn
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) October 16, 2024
अविनाश मिश्रा बिग बॉसच्या घरातून बाहेर
प्रोमोमध्ये पुढे बिग बॉस अविनाशला घरातून बाहेर येण्याचा आदेश देत असल्याचेही दाखवण्यात आलं आहे. यानंत अविनाश घराबाहेर पडताना दिसत आहे, तर यावेळी ईशा सिंह ढसाढसा रडते. अविनाश आणि चुम दरांग यांच्यात जोरदार भांडण झालं. त्यानंतर घरातील सदस्यांनी मिळून अविनाशला घराबाहेर जाण्यासाठी थेट नॉमिनेट केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :