Liam Payne Death : पॉप बँड One Direction फेम गायक लियाम पायनेचं निधन, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू
Liam Payne Passes Away : पॉप बँड वन डायरेक्शनचे माजी सदस्य लियाम पायने याचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे.
One Direction Ex-Member Liam Payne Passed Away : जगप्रसिद्ध इंग्लिश पॉप बँड वन डायरेक्शनचा माजी सदस्य गायक लियाम पायने याचा मृत्यू झाला आहे. लियाम पायने याचा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्स येथील हॉटेलच्या बाहेरून लियाम याचा मृतदेह सापडला आहे. वयाच्या 31 व्या वर्षी लियामने अखेरचा श्वास घेतला. लियाम ड्रग्सच्या प्रभावाखाली होता, असं सांगितलं जात असून, त्यामुळेच त्याचा तिसऱ्या मजल्यावरून पडून त्याचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.
प्रसिद्ध गायकाचं वयाच्या 31 व्या वर्षी निधन
मीडिया रिपोर्टनुसार, मिळालेल्या माहितीप्रमाणे अर्जेंटिनामधील एका हॉटेलच्या बाहेर लियाम पायनेचा मृतदेह आढळून आला. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून त्याचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. लियाम ड्रग्सच्या नशेत असताना तोल जाऊन तो इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळला. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.
One Direction बँडचा माजी सदस्य फेम गायक लियाम पायनेचं निधन
पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्स आणि दारुच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. ज्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा मृतदेह लियाम पायनेचं असल्याचं स्पष्ट झालं. लियाम पायनेच्या मृत्यूच्या बातमीने त्याच्या कुटुंबियांसह चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जगभरातील त्यांच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
🚨 Former One Direction member Liam Payne has passed away after reportedly "falling" from his third-floor hotel room in Argentina.
— Wired_In (@GetWired_In) October 16, 2024
This news follows legal action initiated by his ex-fiancée Maya Henry, who filed a cease and desist letter, claiming he had been repeatedly… pic.twitter.com/Swocb1qZ4X
इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू
लियाम पायने प्रसिद्ध ब्रिटीश गायक आहे. वन डायरेक्शन पॉप बॉय बँडमुळे त्याला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली होती. 2010 मध्ये एक्स फॅक्टर शोमध्ये हा बँड तयार झाला होता. या बँडमध्ये लियाम पायनेसह हॅरी स्टाईल्स, झायन मलिक, नायल होरान आणि लुइस टॉमिलसन हे सदस्य सामील होते. 2016 मध्ये या बँडमधील सर्व सदस्य वेगळे झाले होते. बॉय बँड सोडल्यानंतर सर्व गायक त्यांच्या वैयक्तिक करियरवर लक्ष केंद्रित केलं.
We’re deeply saddened to learn of Liam Payne’s tragic passing today. During this difficult time, our hearts remain with his family, loved ones, and fans. pic.twitter.com/OT63aeAvGO
— MTV (@MTV) October 16, 2024
महत्त्वाच्या इतर बातम्या :