Bigg Boss 18 : सलमान खानच्या जीवाला धोका, बिश्नोई गँगच्या धमकीमुळे 'वीकेंड का वार'चं शूटींग रद्द?
Bigg Boss 18 : बिग बॉस 18 च्या आगामी 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान गैरहजर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Bigg Boss 18 : बिग बॉस 18 छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो आहे. बिग बॉस 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. दरम्यान, आता बिग बॉस 18 च्या आगामी 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान गैरहजर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सलमान खानच्या जीवाला धोका असल्याने त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सलमान खान 'वीकेंड का वार'चं शूटींग करणार नसल्याची चर्चा आहे.
सलमान खानचं वीकेंड का वारचं शूटींग रद्द?
माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बिश्नोई गँगचा यामध्ये हात असून या प्रकरणात नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. अभिनेता सलमान खान आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याचं बोललं जात आहे. सलमान खानच्या घरावर याआधी गोळीबार झाला होता, त्यानंतर त्याला वारंवार धमक्याही देण्यात आल्या आहेत. हे पाहता आता त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याचं कारणास्तव सलमान खान बिग बॉस वीकेंड का वारमध्ये या आठवड्यात दिसणार नसल्याचं बोललं जात आहे.
सुरक्षेसाठी सलमान बिग बॉस शोपासून लांब राहणार?
सलमान खानचे चाहतेही सध्या खूप चिंतेत आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची बातमी समजताच अभिनेता बिग बॉसचे शूट सोडून रुग्णालयात पोहोचला होता. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई असल्याची बातमी समोर येताच सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या घरी कुटुंबियांव्यक्तिरिक्त कोणत्याही व्यक्तीला जाण्याची परवानगी नाही.
सलमानच्या जागी होस्ट कोण असणार?
मीडिया रिपोर्टनुसार, सुरक्षेसाठी सलमान खान बिग बॉसच्या आगामी काही एपिसोडमध्ये गैरहजर राहण्याची शक्यता आहे. सलमान खानच्या शूटींगबाबतची माहिती अत्यंत गोपीनीय ठेवण्यात येत आहे, कारण त्याच्या हालचालींवर बिश्नोई गँगचं लक्ष आहे. त्यामुळे धोका पाहता सलमान खान बिग बॉसपासून काही दिवस लांब राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान, फराह खान किंवा अनिल कपूर यापैकी कुणीतरी सलमान खानच्या जागी होस्टची जबाबदारी पार पाडू शकतो, असं सांगितलं जात आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :