VIDEO: 'बिग बॉस' जिंकल्यानंतर ट्रॉफी घेऊन डोंगरीमध्ये पोहचला मुनव्वर फारुकी; नेटकरी म्हणाले,"डोंगरी का शेर"
Bigg Boss 17: मुनव्वर (Munawar Faruqui) बिग बॉस-17 या कार्यक्रमाची ट्रॉफी घेऊन डोंगरीमध्ये पोहोचला आहे. डोंगरीमधील मुनव्वरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरील बिग बॉस-17 (Bigg Boss 17) या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले काल (28 जानेवारी) पार पडला. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) हा बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा विजेता ठरला आहे. कालपासूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी मुनव्वरवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अशातच आता मुनव्वर बिग बॉस-17 या कार्यक्रमाची ट्रॉफी घेऊन डोंगरीमध्ये पोहोचला आहे. डोंगरीमधील मुनव्वरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
ट्रॉफी घेऊन डोंगरीमध्ये पोहचला मुनव्वर
मुनव्वर फारुकी डोंगरी येथे पोहोचल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मुनव्वर हा त्याच्या कारचे सनरूफ उघडून बाहेर येताच त्याचे हजारो चाहते त्याच्या गाडीजवळ गर्दी करतात. डोंगरीमधील मुनव्वरच्या चाहत्यांनी मुनव्वर आणि बिग बॉस-17 ची ट्रॉफी पाहण्यासाठी गर्दी केली. या व्हिडीओमध्ये मुनव्वर हा ऑफ व्हाईट जॅकेट आणि काळी जीन्स अशा लूकमध्ये दिसत आहे. मुनव्वरनं यावेळी चाहत्यांचे आभार देखील मानले.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
मुनव्वरनं व्यक्त केला आनंद
काल मुनव्वरचा वाढदिवस होता. मुनव्वर फारुकीला वाढदिवशी चाहत्यांनी मोठं गिफ्ट मिळालं. त्यानं बिग बॉस-17 च्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. एबीपी माझासोबत बोलताना मुनव्वर म्हणाला, "वाढदिवशी मला मिळालेली ही सर्वोत्कृष्ट भेट आहे. ही भेट मी माझ्या चाहत्यांना समर्पित करतो. या रोलरकोस्टर प्रवासात चाहते त्याच्या पाठीशी उभे राहिले आहेत. मी कधी बिग बॉसमध्ये सहभागी होईल तेथील आव्हानांचा सामना करेल, असं मला कधी वाटलं नव्हतं"
मुनव्वरवर बक्षिसांचा वर्षाव
मुनव्वर फारुकीला बिग बॉस-17 या कार्यक्रमाची ट्रॉफी मिळाली तसेच मुनव्वरला 50 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले आहे. तसेच त्याला एक कार देखील मिळाली आहे.
लॉक-अप या शोमुळे मुनव्वरला विशेष लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाचा देखील मुनव्वर विजेता ठरला होता. हा कार्यक्रम जिंकल्यानंतर मुनव्वरला ट्रॉफी, 20 लाख रुपयांचे रोख पारितोषिक, गाडी हे मिळाली होती.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: