एक्स्प्लोर

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'मध्ये पार पडलं पहिलं एलिमिनेशन; 'या' स्पर्धकाचा प्रवास थांबला

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'मध्ये पहिलं एलिमिनेशन पार पडलं आहे.

Bigg Boss 17 Soniya Bansal Eviction : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आता 'वीकेंड का वार' या सेगमेंटमध्ये 'बिग बॉस 17'चं पहिलं एलिमिनेशन पार पडलं आहे. त्यामुळे घरातील पहिल्या स्पर्धकाचा प्रवास आता थांबला आहे. अभिनेत्री सोनिया बंसल (Soniya Bansal) 'बिग बॉस 17'मधून एक्झिट घेणारी पहिली स्पर्धक ठरली आहे.

सोनिया बंसलचा प्रवास थांबला...

'बिग बॉस 17'च्या घरातून कोण बाहेर पडणार हे ठरवणं प्रेक्षकांच्या हातात होतं. या आठवड्यात ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, सोनिया बंसल, सना रईस खान, खानजादी आणि सनी आर्य उर्फ तहलका भाई हे स्पर्धक नॉमिनेट झाले होते. यात सना रईस खान आणि सोनिया बंसल यांना सर्वात कमी वोट्स मिळाले. या दोघींमधून कोण स्पर्धक बाहेर पडणार हे ठरवण्याची प्रेक्षकांची जबाबदारी होती. अखेर स्पर्धकांनी सनाला सेफ केलं असून सोनिया बंसलचा 'बिग बॉस 17'चा प्रवास थांबला आहे. 

सना खानला वाचवलं मित्रांनीच...

'बिग बॉस 17'च्या पहिल्या आठवड्यातील 'वीकेंड का वार'मध्ये एकही स्पर्धक घराबाहेर पडला नव्हता. त्यानंतर युट्यूबर तहलका, रॅपर खानजादी, वकील रईस खान, सोनिया बंसल, नील भट्ट, ऐश्वर्या शर्मा हे सहा स्पर्धक 'बिग बॉस 17'साठी नॉमिनेट झाले. सना आणि सोनिया यांच्यात 'बिग बॉस 17'मध्ये सना कमी अॅक्टिव्ह दिसली. पण मित्रांनी सना खानला वाचवलं. 

सोनिया बंसल कोण आहे? (Who is Soniya Bansal)

सोनिया बन्सलचा जन्म 28 ऑक्टोबर 1996 रोजी आग्रा येथे झाला. तिचे वडील बैजनाथ बन्सल हे आर्मी ऑफिसर आहेत. सोनियाने शिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली. तिने फिल्मफेअर आणि लॅक्मे या कंपन्यांच्या कार्यक्रमामध्ये रॅम्प वॉक देखील केला आहे. मॉडलिंग क्षेत्रात आपला ठसा उमटवल्यानंतर सोनियाने अनेक प्रसिद्ध म्युझिक व्हिडीओमध्ये देखील काम केले आहे. तिने झी, टी-सीरीज आणि व्हीनस यांच्या म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले आहे.

'बिग बॉस 17'मध्ये पहिल्या वाइल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री!

सलमान खानच्या 'बिग बॉस 17'मध्ये आता पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री झाली आहे. अभिनेत्री मनस्वी ममगई 'बिग बॉस 17'ची पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धक ठरली आहे. मनस्वी शेवटची काजोलच्या 'द ट्रायल' या वेबसीरिजमध्ये झळकली होती. या सीरिजमध्ये तिने मोहित सिंहची गर्लफ्रेंड जूही भाटियाची भूमिका साकारली होती. मनस्वीने 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2010' पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. 

संबंधित बातम्या

Soniya Bansal: सोनिया बन्सल 'बिग बॉस-17' मध्ये झाली सहभागी; अभिनेत्रीनं साऊथ चित्रपटसृष्टीत केलंय काम

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Weekend ka vaar Bigg Boss 20: 'बिग बॉस 20'चा पहिलाच 'विकेंड का वार' गाजला; तिघांना सलमानचा इशारा, काझीचं तोंडभरून कौतुक, नेमकं काय घडलं?
'बिग बॉस 20'चा पहिलाच 'विकेंड का वार' गाजला; तिघांना सलमानचा इशारा, काझीचं तोंडभरून कौतुक, नेमकं काय घडलं?
Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: ज्याला देव मान्य नाही… त्याच्याच घरात बाप्पा आणण्याचा स्वामींचा हट्ट; समर्थांची अगाथ लीला, काय घडणार?
ज्याला देव मान्य नाही… त्याच्याच घरात बाप्पा आणण्याचा स्वामींचा हट्ट; समर्थांची अगाथ लीला, काय घडणार?
Jahnavi Killekar Pranali Suryawanshi Viral Video: 'बाळा...' प्रणाली सूर्यवंशीची 'ती' हाक ऐकून स्टेजवर उभ्या असलेल्या जान्हवी किल्लेकरच्या तळपायाची आग मस्तकात का गेली? म्हणाली...
'बाळा...' प्रणाली सूर्यवंशीची 'ती' हाक ऐकून स्टेजवर उभ्या असलेल्या जान्हवी किल्लेकरच्या तळपायाची आग मस्तकात का गेली? म्हणाली...
Vikas Samudre Facebook Post: मराठी अभिनेत्याची हादरवणारी फेसबुक पोस्ट, खळबळ माजताच झटक्यात चक्रं फिरली, पोलिसांनी शेवटच्या क्षणी...
मराठी अभिनेत्याची हादरवणारी फेसबुक पोस्ट, खळबळ माजताच झटक्यात चक्रं फिरली, पोलिसांनी शेवटच्या क्षणी...

व्हिडीओ

Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs AGF :बेबी बॉस वैभव सूर्यवंशी बेंचवर संजू इन, अफगाणिस्तान विरोधातील पहिल्या टी 20 साठी दिग्गज खेळाडूनं भारताची प्लेईंग इलेव्हन निवडली
वैभव सूर्यवंशी OUT संजू IN, दिग्गज खेळाडूनं अफगाणिस्तान विरोधातील पहिल्या टी 20 साठी भारताची प्लेईंग इलेव्हन निवडली
Manoj Jarange On Amruta Fadnavis: मनोज जरांगेंनी अमृता फडणवीसांना वचन दिलं, म्हणाले, 'अमृता ताईंना शब्द दिला, आम्ही शांततेनेच..'
मनोज जरांगेंनी अमृता फडणवीसांना वचन दिलं, म्हणाले, 'अमृता ताईंना शब्द दिला, आम्ही शांततेनेच..'
Mumbai Crime News: डेटिंग ॲपवरून मैत्री; हॉटेलमध्ये भेटायला बोलवून बिअर पाजली अन् सख्ख्या बहिणींसोबत नको ते केलं; मुंबईतील धक्कादायक घटना
डेटिंग ॲपवरून मैत्री; हॉटेलमध्ये भेटायला बोलवून बिअर पाजली अन् सख्ख्या बहिणींसोबत नको ते केलं; मुंबईतील धक्कादायक घटना
मोठी बातमी, पाचगणीमधून लष्कर-ए-तोयबाशी संबंधित व्यक्तीस अटक; मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
मोठी बातमी, पाचगणीमधून लष्कर-ए-तोयबाशी संबंधित व्यक्तीस अटक; मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मनोज जरांगे पाटलांनी मुंबई पोलिसांना धाडलं पत्र, 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी मागितली, पोलिसांचं वेट अँड वॉच धोरण
मनोज जरांगे पाटलांनी मुंबई पोलिसांना धाडलं पत्र, 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी मागितली, पोलिसांचं वेट अँड वॉच धोरण
Sunetra Pawar Post:
"दादांची रांगोळी पाहिली अन् मन थांबलं..."; अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार पुन्हा भावूक, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
Chhatrapati Sambhajinagar : गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
Ganesh Chaturthi 2026 : गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वे 386 विशेष रेल्वे गाड्या चालवणार, मुंबईत मेट्रोची मध्यरात्रीपर्यंत सेवा सुरु राहणार, कोकणात जाणारी वाहनं खालापूरमार्गे वळवली 
गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वे 386 विशेष रेल्वे गाड्या चालवणार, मुंबईत मेट्रोची मध्यरात्रीपर्यंत सेवा सुरु राहणार
Embed widget