![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Soniya Bansal: सोनिया बन्सल 'बिग बॉस-17' मध्ये झाली सहभागी; अभिनेत्रीनं साऊथ चित्रपटसृष्टीत केलंय काम
अभिनेत्री सोनिया बन्सलनं (Soniya Bansal) काल (15 ऑक्टोबर) बिग बॉसच्या घरात (Bigg Boss 17) एन्ट्री केली आहे. जाणून घेऊयात सोनिया बन्सलबद्दल...
![Soniya Bansal: सोनिया बन्सल 'बिग बॉस-17' मध्ये झाली सहभागी; अभिनेत्रीनं साऊथ चित्रपटसृष्टीत केलंय काम bigg boss 17 contestant Soniya Bansal complete details detailed profile Soniya Bansal bigg boss 17 salman khan introduce Soniya Bansal Soniya Bansal: सोनिया बन्सल 'बिग बॉस-17' मध्ये झाली सहभागी; अभिनेत्रीनं साऊथ चित्रपटसृष्टीत केलंय काम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/67ffb802880befd48587c59b6f332f5b1697453875264259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Soniya Bansal: लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस सीझन 17' ची (Bigg Boss 17) सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या या सीझनमध्ये 17 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. टीव्ही स्टार, युट्यूबर, रॅपर अशा स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनिया बन्सल (Soniya Bansal) देखील या शोचा एक भाग बनली आहे. जाणून घेऊयात सोनिया बन्सलबद्दल...
मॉडलिंग क्षेत्रात सोनियानं काम केलं काम
सोनिया बन्सलचा जन्म 28 ऑक्टोबर 1996 रोजी आग्रा येथे झाला. तिचे वडील बैजनाथ बन्सल हे आर्मी ऑफिसर आहेत. सोनियाने शिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली. तिने फिल्मफेअर आणि लॅक्मे या कंपन्यांच्या कार्यक्रमामध्ये रॅम्प वॉक देखील केला आहे. मॉडलिंग क्षेत्रात आपला ठसा उमटवल्यानंतर सोनियाने अनेक प्रसिद्ध म्युझिक व्हिडीओमध्ये देखील काम केले आहे. तिने झी, टी-सीरीज आणि व्हीनस यांच्या म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले आहे.
शक्ती कपूर यांच्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये केलं पदार्पण
सोनियाने गेल्या वर्षी 'गेम 100 करोड का' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटामध्ये तिनं शक्ती कपूर आणि राहुल रॉय यांच्यासोबत काम केलं. या चित्रपटानं फारशी कमाई केली नाही. पण या चित्रपटामधील सोनियाच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले.
'या' साऊथ चित्रपटांमध्ये केलं काम
सोनिया बन्सलने हिंदीसोबतच काही साऊथ चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिनं 'धीरा' आणि 'येस बॉस' या चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. याशिवाय हॉटस्टार ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या 'शूरवीर' या वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे.
आता बिग बॉसच्या घरात सोनिया कशा प्रकारे टास्क खेळणार? हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. नुकताच सोशल मीडियावर बिग बॉस या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल झाला. या प्रोमोमध्ये सोनियाचा ग्लॅमरस अंदाज दिसत आहे. या प्रोमोला कॅप्शन देण्यात आलं, "ग्लॅमर से भरपूर, करने दिल, दिमाग और दम के इस खेल में कम्पिट, आ रही है सोनिया बन्सल"
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)