Bigg Boss 17: "तुझी आई जेव्हा अंकिताला..."; बिग बॉसमध्ये करण जोहरनं विकीला झाप झाप झापलं!
Bigg Boss 17: वीकेंड का वारच्या एपिसोडमध्ये करणनं विकाला त्याच्या आईच्या बोलण्याबाबत सांगितलं.
Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरील बिग बॉस 17 (Bigg Boss 17) या कार्यक्रमाच्या गेल्या एपिसोडमध्ये स्पर्धकांचे कुटुंबीय जवळपास 13 आठवड्यांनंतर त्यांना भेटण्यासाठी शोमध्ये आले होते. यावेळी अंकिता लोखंडेची (Ankita Lokhande) आई आणि विकी जैनची (Vicky Jain) आई यांनी देखील बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली. अंकिता आणि विकी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून भांडणं होत आहेत. अशताच बिग बॉसने विकीच्या आईला थेरपी रुममध्ये अंकिता लोखंडेसोबत चर्चा करण्यास सांगितले. यावेळी विकीची आई आणि अंकिता यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टींबाबत चर्चा झाली. आता वीकेंड का वारच्या एपिसोडमध्ये करणनं विकाला त्याच्या आईच्या बोलण्याबाबत सांगितलं.
करणनं विकाला झापलं!
विकीच्या आईने अंकितावर अनेक आरोप केले. त्या म्हणाल्या की, अंकिता विकीसोबत गैरवर्तन करते. विकीच्या आईसोबत केलेल्या चर्चेनंतर अंकिताने विकी आणि त्याच्या आईची अनेकवेळा माफी मागितली आणि रडली देखील. आता करण जोहरने विकीला त्याच्या आईसमोर पत्नीसाठी भूमिका न घेतल्याबद्दल खडसावले.
नुकताच बिग बॉस सीझन 17 चा नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये करण जोहर हा विकी जैनला झापताना दिसतोय . तो विकीला म्हणतो, "विकी, जेव्हा तुझी आई अंकिताला येऊन अनेक प्रश्न विचारते, तेव्हा पती म्हणून तू तिच्या मागे उभं राहायला हवं होतंस."
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
विकीची आई अंकिताला काय म्हणाली?
बिग बॉसच्या घरात विकीची आई अंकिताला म्हणते,ज्या दिवशी तू विकीला लाथ मारलीस. त्या दिवशी मी तुझ्या आईला फोन करून विचारले, तुम्ही देखील तुमच्या पतीला अशी लाथ मारली का? सासूचे हे शब्द ऐकून अंकिताला राग येतो. ती म्हणते,"आईला फोन करायची काय गरज होती? माझे वडील काही दिवसांपूर्वी वारलेत. प्लीज माझ्या आईवडिलांना काही बोलू नका."
बिग बॉस 17 च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यात अनेक वेळा विविध विषयांमुळे भांडण झाले आहे. या जोडीमध्ये सतत गैरसमज आणि वाद होत असतात, ज्याची चर्चा या शोमध्ये अनेकदा झाली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
VIDEO: विकीची आई पुन्हा चर्चेत; सासूबाई 'लाथ' प्रकरणाबद्दल बोलताच भडकली अंकिता, म्हणाली...