VIDEO: विकीची आई पुन्हा चर्चेत; सासूबाई 'लाथ' प्रकरणाबद्दल बोलताच भडकली अंकिता, म्हणाली...
Bigg Boss 17: बिग बॉस-17 या शोचा एक प्रोमो समोर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये विकीची आई अंकितासोबत बोलताना दिसत आहे.
![VIDEO: विकीची आई पुन्हा चर्चेत; सासूबाई 'लाथ' प्रकरणाबद्दल बोलताच भडकली अंकिता, म्हणाली... Bigg Boss 17 ankita lokhande gets angry on vicky jain mother in law VIDEO: विकीची आई पुन्हा चर्चेत; सासूबाई 'लाथ' प्रकरणाबद्दल बोलताच भडकली अंकिता, म्हणाली...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/09/6137ab19711cbfee8bf09a09e7248ccd1704785892249259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरील बिग बॉस 17 (Bigg Boss 17) या शोमध्ये सध्या फॅमिली वीक सुरू झाला आहे. बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडेची (Ankita Lokhande) आई आणि विकी जैनची (Vicky Jain) आई काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. आता पुन्हा विकीच्या आईनं आणि अंकिताच्या आईनं बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. आईला भेटल्यानंतर अंकिता खूपच भावूक झाली. आता बिग बॉस-17 या शोचा एक प्रोमो समोर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये विकीची आई अंकितासोबत बोलताना दिसत आहे. अंकिताने विकीला लाथ मारल्याबद्दल विकीची आई बोलत आहे. हे ऐकून अंकिताला राग येतो, असं प्रोमोमध्ये दिसत आहे.
आईला पाहिल्यानंतर अंकिता झाली भावूक
बिग बॉस 17 या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अंकिताची आई बिग बॉसच्या घरात एन्ट्री करते. आईला पाहिल्यानंतर अंकिता भावूक होते. त्यानंतर विकीची आई रंजना जैन बिग बॉसच्या घरात एंट्री करते. त्यानंतर विकीची आई अंकितासोबत लाथ प्रकरणाबाबत बोलते.
सासूबाईंवर भडकली अंकिता
प्रोमोमध्ये दिसत आहे की, विकीची आई अंकिताला म्हणते, ज्या दिवशी तू विकीला लाथ मारलीस. त्या दिवशी मी तुझ्या आईला फोन करून विचारले, तुम्ही देखील तुमच्या पतीला अशी लाथ मारली का? सासूचे हे शब्द ऐकून अंकिताला राग येतो. ती म्हणते,"आईला फोन करायची काय गरज होती? माझे वडील काही दिवसांपूर्वी वारलेत. प्लीज माझ्या आईवडिलांना काही बोलू नका."
Promo #BiggBoss17 Nominations Me Ulta pher, aur Family week me aaye gharwale pic.twitter.com/ohXOnNTHQv
— The Khabri (@TheKhabriTweets) January 8, 2024
नेटकऱ्यांनी विकीच्या आईला केलं ट्रोल
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बिग बॉस 17 या कार्यक्रमाच्या प्रोमोला कमेंट करुन अनेक नेटकरी विकीच्या आईला ट्रोल करत आहेत. "विकीची आई खूप निगेटिव्ह आहे", असं अनेट नेटकऱ्यांचे मत आहे.
गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात विकी आणि अंकिता यांची भांडणं होतं आहेत. काही दिवसांपूर्वी विकीच्या आईनं आणि अंकिताच्या आईनं बिग बॉसच्या घरात येऊन अंकिता आणि विकीला भांडणं न करण्याचा सल्ला दिला होता.
प्रेक्षक बिग बॉसच्या आगामी एपिसोडची उत्सुकतेने वाट बघत असतात. ऐश्वर्या शर्मा,नील भट्ट, मुनव्वर फारुकी,मनारा चोप्रा,नावेद सोल,अनुराग डोभाल,जिग्ना वोरा,सोनिया बन्सल यांनी देखील बिग बॉस-17 या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)