Bigg Boss 17 Grand Finale: मुनव्वर फारुकी ठरला 'बिग बॉस-17' चा विजेता
Bigg Boss 17 Grand Finale Live Updates: बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या विजेत्याला किती रक्कम मिळणार? तसेच हा ग्रँड फिनाले प्रेक्षक कुठे पाहू शकणार आहेत? या सर्व गोष्टी जाणून घेऊयात...
LIVE
Background
Bigg Boss 17 Grand Finale Live Updates: छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चेत असणाऱ्या बिग बॉस 17 (Bigg Boss 17) या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले आज (28 जानेवारी) पार पडणार आहे. आता या स्पर्धेतील टॉप-5 स्पर्धकांपैकी कोणता स्पर्धक बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोरणार? हे आता लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेशी संबंधित प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत. बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या विजेत्याला किती रक्कम मिळणार? तसेच हा ग्रँड फिनाले प्रेक्षक कुठे पाहू शकणार आहेत? या सर्व गोष्टी जाणून घेऊयात...
'बिग बॉस 17' चे टॉप-5 स्पर्धक (Bigg Boss 17 Top 5 Contestants)
अंकिता लोखंडे, मुनावर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण मशेट्टी या टॉप-5 स्पर्धकांपैकी कोणता स्पर्धक बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोणार? याकडे सध्या अनेकांचे लक्ष लागले आहे. बिग बॉस 17 कार्यक्रमातील स्पर्धकांसाठी सध्या प्रेक्षक वोट करत आहेत.
बिग बॉस 17 चा ग्रँड फिनाले कधी आणि कुठे पाहू शकता?
बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले 28 जानेवारी रोजी जिओ सिनेमा आणि कलर्स टीव्हीवर प्रेक्षकांना बघता येणार आहे. हा रिॲलिटी शो संध्याकाळी सहा वाजता सुरु होणार असून तो रात्री 12 वाजेपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
विजेत्याला काय-काय मिळणार?
बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या विजेत्याला बक्षीस म्हणून 30-40 लाख रुपये मिळणार आहेत, असं म्हटलं जात आहे. तसेच विजेत्याला ट्रॉफीशिवाय कारही मिळेल.
View this post on Instagram
ग्रँड फिनालेला सेलिब्रिटी लावणार हजेरी
ओरी, भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, अब्दू हे सेलिब्रिटी बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये हजेरी लावणार आहेत.
बिग बॉस 17 (Bigg Boss 17) या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) यांच्यात मतभेद झालेले पहायला मिळाले. आता अंकिता ही बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचली आहे.
ऐश्वर्या शर्मा,नील भट्ट,नावेद सोल,अनुराग डोभाल,जिग्ना वोरा,सोनिया बन्सल यांनी देखील बिग बॉस-17 या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. बिग बॉस-17 चे सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान करतो. आता बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Bigg Boss 17 : मनारा चोप्रा बिग बॉस-17 मधून आऊट; मुनव्वर आणि अभिषेकमध्ये चुरशीची लढत
Bigg Boss 17 : मनारा चोप्रा बिग बॉस-17 मधून आऊट झाली आहे. आता मुनव्वर आणि अभिषेकमध्ये ट्रॉफीसाठी चुरशीची लढत होणार आहे.
Bigg Boss 17: बिग बॉसच्या मंचावर खान ब्रदर्स आले एकत्र; 'मुन्ना बदनाम हुआ' गाण्यावर केला डान्स
Bigg Boss 17: बिग बॉसच्या मंचावर तिन्ही खान आले एकत्र आले आहेत. अरबाज खान, सोहेल खान आणि सलमान खान यांनी बिग बॉस-17 च्या ग्रँड फिनालेमध्ये हजेरी लावली. यावेळी 'मुन्ना बदनाम हुआ' या गाण्यावर या तिघांनी डान्स केला.
Bigg Boss 17 Grand Finale: चाहत्यांना मोठा धक्का! अंकिता लोखंडे बिग बॉस-17 मधून आऊट; हे स्पर्धक ठरले, टॉप-3 स्पर्धक
Bigg Boss 17 Grand Finale : बिग बॉसच्या 17 च्या घरातून अंकिता लोखंडे बाहेर पडली आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अंकिता बाहेर पडल्यामुळे आता बिग बॉसच्या घरात मुन्नवर फारुकी, अभिषेक कुमार आणि मन्नार चोप्रा हे 3 स्पर्धक उरले आहेत. त्यातीलच एक बिग बॉस 17 विजेता ठरणार आहे.
Bigg Boss 17 Grand Finale: चाहत्यांना मोठा धक्का! अंकिता लोखंडे बिग बॉस-17 मधून आऊट; हे स्पर्धक ठरले, टॉप-3 स्पर्धक
Bigg Boss 17 Grand Finale : बिग बॉसच्या 17 च्या घरातून अंकिता लोखंडे बाहेर पडली आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आता बिग बॉसच्या घरात 3 स्पर्धक उरले आहेत. त्यातीलच एक बिग बॉस 17 विजेता ठरणार आहे.
Bigg Boss 17 : एमसी स्टॅनची बिग बॉसच्या सेटवर एंट्री
Bigg Boss 17 : बिग बॉस 17 मध्ये एमसी स्टॅनची देखील एंट्री झाली आहे. एमसी स्टॅन बिग बॉस 16 चा विजेता ठरला होता.