Isha Malviya: "उडारियां" मधील जॅस्मिनची बिग बॉसच्या घरात झाली एन्ट्री; कोण आहे ईशा मालवीय? जाणून घ्या अभिनेत्रीबद्दल...
Bigg Boss 17: ईशा मालवीयनं काल बिग बॉसच्या (Bigg Boss 17) घरात एन्ट्री केली आहे. जाणून घेऊयात ईशाबद्दल...
Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) सुरू झाला आहे. काल या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर झाला. या प्रीमियरमध्ये कार्यक्रमाचा होस्ट सलमान खानने सीझन 17 च्या स्पर्धकांची माहिती दिली. 'बिग बॉस 17' च्या स्पर्धकांच्या यादीत अभिनेत्री ईशा मालवीयचं (Isha Malviya) देखील नाव आहे. ईशा मालवीयनं काल बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. जाणून घेऊयात ईशाबद्दल...
ईशा मालवीय ही एक अभिनेत्री, मॉडेल आणि फॅशन इन्फ्लुएंसर आहे, 2020 मध्ये ती बी प्राकच्या 'जिसके लिए' या गाण्यात दिसली होती. ईशानं अनेक हिट मालिकांमध्ये काम केलं आहे. "उडारियां" या मालिकेमुळे ईशाला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिनं जॅस्मिन ही भूमिका साकारली. तसेच ईशानं स्वप्नोदन,नमक इस्क का या मालिकांमध्ये काम केलं आहे. ईशा ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव असते. तिला इन्स्टाग्रामवर 1.4 मिलियन फॉलोवर्स आहेत.
View this post on Instagram
अभिषेक कुमार या अभिनेत्याला ईशा काही काळ डेट करत होती. ‘उडारिया’ या मालिकेच्या सेटवर दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, काही काळानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. अभिषेक कुमारनं देखील बिग बॉस 17 या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे प्रेक्षक ईशा आणि अभिषेक यांचा बिग बॉस-17 या कार्यक्रमामधील गेम प्लॅन पाहण्यास उत्सुक आहेत.
'बिग बॉस 17' च्या प्रीमियरमध्येच झाले अभिषेक आणि ईशाचे भांडण
'बिग बॉस 17' च्या प्रीमियर नाइटमध्ये सलमान खान समोर अभिषेक आणि ईशा यांच्यामध्ये बाचाबाची झाली. ईशाने अभिषेकवर शारिरीक हिंसे केल्याचा आरोप केला, तर अभिषेकने सांगितले कीस,ईशाने त्याच्या चेहऱ्यावर नखे मारली आणि तिने जे काही केले ते स्वसंरक्षणार्थ होते. ईशा आणि अभिषेक यांची भांडण पाहिल्यानंतर सलमान देखील थक्क झाला. आता बिग बॉसच्या घरातील टास्क अभिषेक आणि ईशा कसे खेळणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या: