Bigg Boss 17: अंकिता लोखंडे आणि विकी जैनचा घटस्फोट होणार? बिग बॉसच्या घरात दोघांमध्ये तू-तू मैं-मैं
Bigg Boss 17: बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये पुन्हा अंकिता आणि विकी यांच्यात बाचाबाची झाली आहे. या दोघांचे भांडण इतके वाढले की, अंकितानं थेट घटस्फोटाचा विषय काढला.
![Bigg Boss 17: अंकिता लोखंडे आणि विकी जैनचा घटस्फोट होणार? बिग बॉसच्या घरात दोघांमध्ये तू-तू मैं-मैं Bigg Boss 17 ankita lokhande asks vicky jain for divorce in bigg boss Bigg Boss 17: अंकिता लोखंडे आणि विकी जैनचा घटस्फोट होणार? बिग बॉसच्या घरात दोघांमध्ये तू-तू मैं-मैं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/7e4d7cbc2c6749e1d9d55c66d9547f6a1698984195368209_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरील बिग बॉस 17 (Bigg Boss 17) या कार्यक्रमामध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) हे अनेकदा भांडताना दिसतात. आता बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये पुन्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली आहे. या दोघांचे भांडण इतके वाढले की अंकितानं थेट घटस्फोटाचा विषय काढला.
बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये आयशा खानने विकीला त्याच्या वैवाहिक जीवनाबद्दल विचारले, ज्यावर विकीने जोक केला आणि विवाहित पुरुषाच्या त्रासाबद्दल सांगितले. विकीचे बोलणे ऐकल्यानंतर अंकिता अस्वस्थ झाली. अंकिताने विकी असे बोलण्याचे कारण विचारले. यावर विकी म्हणतो,- 'मला कसे वाटते हे मी कधीच सांगू शकत नाही. विवाहित लोक, विशेषतः पुरुष या परिस्थितीतून जातात. ते नेमके कशातून जातात? कोणत्या वेदनातून जातात? हे ते स्पष्ट करू शकत नाही."
अंकिता विकीला म्हणाली, "तू माझ्यासोबत का आहेस? चल घटस्फोट घेऊ..."
विकीचं उत्तर ऐकून अंकिता आणखीनच अस्वस्थ झाली. त्यानंतर अंकिताने रागाने विकीला घटस्फोटासाठी विचारले, 'तुला एवढा त्रास होत असेल तर तू माझ्यासोबत का आहेस? चल घटस्फोट घेऊ, मला तुझ्याबरोबर घरी परत जायचे नाही. हे सांगताच अंकिता भावूक झाली.
आयशाशी बोलताना अंकिता म्हणाली, 'मला माहित आहे की विकी माझ्यावर प्रेम करतो पण तो मला जे हवे आहे ते तो देत नाहीत. मला कधीकधी वाटतं की तो माझ्यावर नियंत्रण किंवा वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो. मी पाहिले आहे की, जेव्हा मी पुरुष स्पर्धकासोबत भांडते तेव्हा तो मला थांबवतो."
अंकिता लोखंडेने डिसेंबर 2021 मध्ये बिझनेसमन विकी जैनसोबत लग्न केले. त्यांच्या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या दोघांनी ऑक्टोबरमध्ये बिग बॉस 17 च्या घरात प्रवेश केला होता. या घरात ते अनेकदा एकमेकांशी भांडतात.
View this post on Instagram
ऐश्वर्या शर्मा,नील भट्ट, मुनव्वर फारुकी,मनारा चोप्रा,नावेद सोल,अनुराग डोभाल,जिग्ना वोरा,सोनिया बन्सल यांनी देखील बिग बॉस-17 या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे. प्रेक्षक बिग बॉसच्या आगामी एपिसोडची उत्सुकतेने वाट बघत असतात.
संबंधित बातम्या:
VIDEO: बिग बॉसच्या घरात हमसून हमसून रडली अंकिता; विकीसोबत 'या' कारणामुळे झाली बाचाबाची
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)