Bigg Boss 16 : भाईजानच्या बिग बॉसमध्ये प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; ताजिकिस्तानचे सेलिब्रिटी होणार सहभागी?
Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16' हा कार्यक्रम 2 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Bigg Boss 16 : सलमान खानचा (Salman Khan) 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) हा कार्यक्रम सुरू व्हायला अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे सध्या या कार्यक्रमात कोणते स्पर्धक असतील, 'बिग बॉस 16'चं घर कसं असेल याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या पर्वात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. तसेच या पर्वात ताजिकिस्तानचे सेलिब्रिटी सहभागी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
'बिग बॉस 16' हे पर्व अधिक मनोरंजक होण्यासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत. या पर्वात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमध्ये लोकप्रिय चेहरे नसणार आहेत. 'बिग बॉस 16'साठी 18 स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. त्यापैकी चार-पाच स्पर्धकांच्या नावावर शिक्का मोर्तब झालं आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात 'बिग बॉस 16' या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. टीना दत्ता, मान्या सिंह, शिविन नारंग आणि शालीन भनोट आणि अब्दू हे सेलिब्रिटी 'बिग बॉस 16' मध्ये सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अब्दू हा ताजिकिस्तानचा लोकप्रिय गायक असून आता तो 'बिग बॉस 16'मध्ये खेळताना दिसणार आहे.
View this post on Instagram
भाईजान अब्दूला कुठे भेटला?
गेल्या काही दिवसांपूर्वी अब्दू सलमान खानला दुबईत भेटला होता. त्यावेळी अब्दूने खास सलमानसाठी गाणं गायलं होतं. अब्दूने गायलेलं गाणं सलमानच्या पसंतीस उतरलं. त्यानंतर दोघांमध्ये छान मैत्री झाली. अब्दूने 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमातदेखील काम केलं आहे.
अब्दू कोण आहे?
अब्दू हा ताजिकिस्तानचा लोकप्रिय गायक आहे. रॅपसाठी अब्दू खूप लोकप्रिय आहे. अब्जू रोजिक हा ताजिकिस्तानचा लोकप्रिय गायक असला तरी बॉलिवूडमध्येदेखील त्याचे अनेक मित्र आहेत. अब्दूने विराट कोहली, शिल्पा शेट्टीसह अनेक सेलिब्रिटींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
संबंधित बातम्या