Bigg Boss 15 : 'बिग बॉस 15' च्या टॉप 5 स्पर्धकांची घोषणा करणार Salman Khan
Bigg Boss 15 Update : सलमान खान या विकेण्डच्या वारी बिग बॉस 15 च्या टॉप 5 स्पर्धकांची घोषणा करणार आहे. तर बाकीचे स्पर्धक घराबाहेर जाण्याची शक्यता आहे.
Bigg Boss 15 News : सलमान खानचा (Salman Khan) बिग बॉस 15 (Bigg Boss 15) कार्यक्रम सध्या चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात लवकरच एक वादळ येऊन धडकणार आहे. काही सदस्य सोडले तर बिग बॉसच्या घरातील सदस्यांना घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. सलमान खान लवकरच बिग बॉसच्या घरातील टॉप 5 सदस्यांची घोषणा करणार आहे.
बिग बॉस 15 च्या कार्यक्रमाचा एक प्रोमो समोर आलेला आहे. या प्रोमोमध्ये घरातील सदस्य घाबरलेले दिसत आहेत. सलमान खान टॉप 5 स्पर्धकांची घोषणा करणार असल्याने घरातील सदस्यांमध्ये भीतीदायक वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान व्हिडीओमध्ये सलमान खान म्हणतो आहे, "पुढील 48 तासांत तुम्हाला टॉप 5 स्पर्धकांची माहिती मिळणार आहे. बाकी सर्व स्पर्धकांना हे घर सोडावे लागणार आहे".
View this post on Instagram
चाहतेदेखील सोशल मीडियावर बिग बॉसच्या घरात आता कोण राहणार आणि कोण घर सोडणार याची शक्यता वर्तवत आहेत. प्रोमोमुळे आता बिग बॉस 15 च्या फिनालेचीदेखील चर्चा होत आहे. लवकरच बिग बॉस 15 चा फिनाले होणार आहे, असा अंदाज आहे.
याआधीदेखील बिग बॉस 15 च्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार, असे म्हटले जात होते. सलमान खानच्या या वक्तव्यामुळे या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. बिग बॉस 15 च्या पर्वातील टॉप 5 सदस्य कोण असतील हे पाहण्याजोगे असणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha