Bigg Boss 15: Jay Bhanushali वर भडकला Salman Khan, म्हणाला... तु बिग बॉसच्या घरात नसलास तरी फरक पडत नाही
Bigg Boss 15: 'बिग बॉस 15' च्या विकेण्ड स्पेशल भागात सलमान खान रागात दिसून आला आहे. घरातील सदस्यांना सलमान खानने चांगलीच शाळा घेतली आहे.
Bigg Boss 15 Weekend Ka Vaar: बिग बॉस 15 (Bigg Boss 15) च्या कार्यक्रमात येत्या विकेण्डला सलमान खान (Salman Khan) बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धकांना ओरडताना दिसून येणार आहे. जय भानुशालीचीदेखील (Jay Bhanushali) सलमानने चांगलीच शाळा घेतली आहे. नुकताच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सलमान जय भानुशालीला म्हणतो, "जय तुला स्वत:साठी स्टॅंड घेता येत नाही. त्यामुळे तु बिग बॉसच्या घरात नसलास तरी काही फरक पडत नाही".
प्रोमोमध्ये सलमान खान प्रचंड रागात दिसून येत आहे. सलमान प्रोमोमध्ये म्हणतो, जय फक्त बडबड करत असतो. त्याला त्याचे मत मांडता येत नाही. त्यावर जय म्हणतो, मी बोलु का? त्यावर सलमान खान ओरडत बोलतो, तुझं मत जिथे मांडणं अपेक्षित आहे तिथे मांड. जिथे बोलायला हवं तिथे तर बोलताना दिसत नाहीस. त्यामुळे तु घरात नसलास तरी फरक पडत नाही.
View this post on Instagram
जय भानुशाली व्यतिरिक उमर रियाज आणि प्रतिकलादेखील सलमान ओरडताना दिसून येतो. उमर आणि प्रतिकच्या भांडणावरदेखील सलमानने अनेकदा भाष्य केले आहे. प्रतिक घरातील सदस्यांवर विनोद बनवत असल्याने सलमान प्रतिकची शाळा घेणार आहे.
संबंधित बातम्या
Films On Real-Life Incidents: 'जय भीम'सह सत्य घटनेवर आधारित हे सिनेमे करतात प्रेक्षकांचे मनोरंजन
कंगना पुन्हा बरळली: पद्मश्री पुरस्कार पुन्हा करते, पण...
'दिल तो बच्चा है जी' म्हणत सचिन पिळगावकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदेने परिधान केला शाळेचा गणवेश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha