Films On Real-Life Incidents: 'जय भीम'सह सत्य घटनेवर आधारित हे सिनेमे करतात प्रेक्षकांचे मनोरंजन
Films On Real-Life Incidents: 'जय भीम' सिनेमाची चर्चा सध्या देशभरात होताना दिसून येत आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत साऊथचा सूर्या आहे. हा सिनेमा अॅमोझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला होता.
Films On Real-Life Incidents: (Jay Bhim) जय भीम - पोलीस एकाठिकाणी काही आदिवासी समाजातील पुरुषांना जबरदस्तीने घेऊन जातात. तिथे त्यांचा अतोनात छळ करण्यात येतो. पोलीस त्यांना न केलेल्या गुन्ह्याची कबुली देण्यास सांगतात. त्या आदिवासींपैकी एक म्हणजे राजकानू. ज्याची पत्नी आपल्या पतीला वाचवण्यासाठी चंद्रू नावाच्या वकिलाची मदत घेते. चंद्रू मानवाधिकार प्रकरणांवर विशेष लक्ष देतो. पण या प्रकरणाचा तळ गाठताना कोणते घृणास्पद सत्य समोर येते, असे या सिनेमाचे कथानक आहे.
असुरन (Asuran)- 'असुरन' सिनेमा 'वेक्काई' या कादंबरीवर आधारित आहे. ही कादंबरी तामिळनाडूमधील किझवेनमनी येईल एका सत्य घटनेवर आधारित आहे. हा सिनेमा एका गरीब जातीतील शेतकऱ्याच्या मुलाभोवती फिरतो. तो मुलगा पुढे एका श्रीमंत, उच्चवर्णीय जमीनदाराची हत्या करतो.
Rajanna - 2011 साली प्रदर्शित झालेला हा एक तेलुगु अॅक्शन सिनेमा आहे. या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन विजयेंद्र प्रसाद यांनी केले होते. रझाकार चळवळ आणि स्वातंत्र्य सैनिक सुड्डाला हनमंथु यांच्यापासून प्रेरित होऊन हा सिनेमा बनवला आहे.
व्हायरस (Viras) - 2019 प्रदर्शित झालेला वायरस हा सिनेमा मल्याळम भाषेतील आहे. केरळमध्ये 2018 मध्ये झालेल्या निपाह व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट बेतला होता.
Kalloori - तमिळनाडूच्या कृषी महाविद्यालयातील तीन मुलींच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगावर या सिनेमाचे कथानक आधारित आहे. त्या मुलींना 2000 साली धर्मपुरीच्या बसमध्ये जीवंत जाळण्यात आले होते.
The Adigaram Ondru: तमिळनाडूच्या पोलिसांवर आधारित हा सिनेमा आहे. तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात 2005 साली पसरलेल्या अराजकतेवर हा सिनेमा भाष्य करतो.
संबंधित बातम्या
अक्षय कुमार बॉक्स ऑफिसचा 'खिलाडी'; या चित्रपटांनी केली 100 कोटींपेक्षा जास्त कमाई
प्रेक्षकांसाठी यंदाचा आठवडा ठरणार खास, OTT प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाची मेजवाणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha