एक्स्प्लोर
BIG BOSS 13 : WWE Superstar जॉन सीनाचा असिम रियाझला पाठिंबा
WWE सुपरस्टार जॉन सीनाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर असीम रियाजचा फोटो पोस्ट केल्याने बिगबॉस 13 चर्चेचा विषय ठरतं आहे.
मुंबई : बिगबॉस 13 चे पर्व म्हणजे प्रेक्षकांसाठी भरभरुन मनोरंजन ठरत आहे. या पर्वात कोणीची भांडण, कोणाची मैत्री प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. पण या पर्वात असीम रियाझच नशीब सध्या चांगलंच फळफळताना दिसतंय. असीम रियाझ हा colors वाहिनीवरील बिग बॉस13चा सदस्य आहे. यंदाच्या बिग बॉसच्या घरातील असीम रियाझ विरुद्ध सिद्धार्थ शुक्ला अशी लढाई सध्या मीडियावर आणि घरातही पाहायला मिळतेय. त्यात आता असीमला थेट Hollywood आणि WWE सुपरस्टारकडून पाठिंबा मिळाला आहे.
WWE सुपरस्टार जॉन सीनाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर असीम रियाजचा फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोला कॅप्शन दिलेलं नसलं तरी जॉन सीनासारख्या सुपरस्टारची एक पोस्ट बरंच काही बोलून जाते.
असीम रियाझ हा यंदाच्या पर्वामधील चर्चेत राहणाऱ्या सदस्यांपैकी एक आहे. त्याने बिग बॉसच्या घरात असतानाच मागील महिन्यात पंजाबी गायिका आणि बिग बॉस स्पर्धक हिमांशी खुराणावर प्रेम असल्याचं जगजाहीर केलं. त्यानंतर कनेक्शन वीकमध्ये गेल्या आठवड्यात हिमांशी पुन्हा बिग बॉसच्या घरात आल्यावर तिला प्रपोजही केलं. त्यावरुन त्याला सलमानचं बोलणंही खायला लागलं होतं.
विशेष म्हणजे याआधीही बिग बॉसमध्ये WWE सुपरस्टार दलीप सिंह राणा म्हणजेच आपला द ग्रेट खलीने सीझन 4मध्ये सहभाग घेत उपविजेत्याचा मानही मिळवला होता. मात्र WWE विश्वातला असूनदेखील त्याला असा पाठिंबा दुसऱ्या WWE सुपरस्टारने दिलेला दिसला नाही.
असीम रियाझ हा या पर्वातील अंतिम आठवड्यात पोहचलेला पहिला सदस्य आहे. त्याच्यापाठोपाठ सिद्धार्थ शुक्ला देखील अंतिम आठवड्यात पोहचला आहे. आता बिग बॉसचं हे पर्व संपायला अवघे 10 दिवस उरले आहेत. त्यामुळे जॉन सीनाने त्याचा फोटो पोस्ट करुन दिलेला पाठिंबा असीम रियाझच्या हाती विजयाची ट्रॉफी देतो का हे येत्या 10 दिवसांत कळेल.
Salman Khan | सेल्फी घेणाऱ्या चाहत्यासोबत दबंग खानचं उर्मट वर्तन | ABP Majha
संबंधित बातम्या
बिग बॉसचे आजवरचे सर्व विजेते
दीपिका कक्कर इब्राहिम बिग बॉस 12ची विजेती
अनुप जलोटा बिग बॉसमधील आतापर्यंतचे सर्वात महागडे स्पर्धक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
कोल्हापूर
सोलापूर
Advertisement