Appi Aamchi Collector : 'या मालिकेचं नाव बदलून टाका, कलेक्टरची कामं दाखवा', 'अप्पी आमची कलेक्टर'च्या नव्या प्रोमोवर भडकले प्रेक्षक
Appi Aamchi Collector : अप्पी आमची कलेक्टरच्या नव्या प्रोमोवर प्रेक्षकांची नाराजी दर्शवली आहे. तसेच या मालिकेच्या क्लायमॅक्सला देखील प्रेक्षक कंटाळले असल्याचं पाहायला मिळतंय.
Appi Aamchi Collector : झी मराठी वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Aamchi Collector) ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. सात वर्षांनी अप्पी आणि अर्जुन एकमेकांसमोर आले आहेत. इतकच नव्हे तर आता छोटा सिंबा अप्पी आणि अर्जुनला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं पहायला मिळतंय. अर्जुनला अजूनही सिंबा हा त्याचा मुलगाच आहे, हे कळालं नाही. त्यामुळे अर्जुनच्या घरचे त्याचं दुसरं लग्न लावण्याचे प्रयत्न करतात. पण यावेळी सिंबा अर्जुन आणि अप्पीला एकत्र आणण्याचं ठरवतो.
मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. पण या नव्या प्रोमोवर काही प्रेक्षक भडकले देखील आहे. खरंतर या मालिकेचं नाव अप्पी आमची कलेक्टर असं आहे. या मालिकेत अप्पीचं कलेक्टर होण्याचं स्वप्न वैगरे असा आशय दाखवण्यात आलाय. पण सध्या मालिकेत हे सगळं सोडून इतर बऱ्याच गोष्टी दाखवल्या जात आहे. त्यामुळे या मलिकेवर प्रेक्षकांची काहीशी नाराजी पाहायला मिळतेय. त्यातच आता या मालिकेचं नावच बदलून टाका अशा कमेंट्स काहींना या प्रोमोवर केल्यात. तर काहींना जरा कलेक्टरचं काम पण दाखवा असंही म्हटलंय.
View this post on Instagram
'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेबद्दल जाणून घ्या... (Appi Aamchi Collector)
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत अप्पी अर्थात अपर्णा मानेच्या भूमिकेत शिवानी नाईक आहे. एक वेगळा विषय या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, ही ती मुलगी आहे जी ग्रामीण भागातील खेडे गावात रहाते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही. पण तिचं ध्येय खुप मोठ्ठ आहे. तिला येणाऱ्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होते. अशी ही संघर्ष कथा आहे.