Bigg Boss Marathi : 'मौंजुलिका'! भाऊच्या धक्क्यावर जान्हवीच्या बाबतीत अंकिताचा मोठा खुलासा, रितेश भाऊलाही बसला धक्का
Bigg Boss Marathi : भाऊच्या दुसऱ्या धक्क्यावर रितेशने जान्हवीची चांगलीच शाळा घेतली आहे. त्यानंतर अंकिताने केलेल्या धक्कादायक खुलासा केला.
![Bigg Boss Marathi : 'मौंजुलिका'! भाऊच्या धक्क्यावर जान्हवीच्या बाबतीत अंकिताचा मोठा खुलासा, रितेश भाऊलाही बसला धक्का Ankita Walavalkar Gives MONJULIKA tag to Jahnavi Killekar revealed a big thing Ritiesh Deshmukh Bigg Boss Marathi new season Bigg Boss Marathi : 'मौंजुलिका'! भाऊच्या धक्क्यावर जान्हवीच्या बाबतीत अंकिताचा मोठा खुलासा, रितेश भाऊलाही बसला धक्का](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/11/8dfddefcc38379f9aef61180cf6b1baa1723364351506720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss Marathi : बिग बॉसचा (Bigg Boss Marathi New seaon) दुसरा विकेंड हा जान्हवीच्या (Jahnavi Killekar) नावाने गाजला. पण घरात तिने घातलेल्या राड्यांची रितेश भाऊने चांगलीच शाळाही घेतली. त्याचप्रमाणे तिच्या बोलण्यावरूनही रितेशने तिला चांगलच झापलं. जान्हवीने वर्षाताईंसोबत केलेल्या वागणुकीवरही रितेशने तिला चांगलेच खडेबोल सुनावले. या सगळ्यानंतर अंकिताने (Ankita Walavalkar) तिला दिलेल्या टॅगची बरीच चर्चा झाली. यावेळी अंकिताने केलेल्या एका खुलश्यामुळे रितेश भाऊलाही धक्काच बसला.
जान्हवी आणि वर्षाताईंमध्ये झालेल्या वादावर महाराष्ट्रातून जान्हवीवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यावर रितेशने तिला म्हटलं की, जेवढे प्रोजेक्ट तू केलेही नसशील तेवढे वर्षाताईंनी रिजेक्ट केले असतील. त्यानंतर घरातील सदस्यांना भेटायला खिलाडी कुमार म्हणजे अक्षय जेव्हा येतो, त्यावेळी तो घरातल्यांना एक टास्क देतो. त्यामध्ये अंकिता 'मौंजुलिका' हा टॅग जान्हवीला देते.
अंकिताच्या खुलाश्यामुळे रितेश भाऊला बसला धक्का
अंकिता हॅशटॅग 'मौंजुलिका' हे जान्हवीला देताना म्हणते की, तिच्याबाबतीत कळतच नाही, ती कधीतरी एकदम रागात असते तर कधीतरी ती वर्षाताईंचे पायही चेपून देते. त्यावर रितेश आश्चर्यचकित होऊन विचारतो की, जान्हवीने वर्षाताईंचे पाय दाबले? त्यावर अंकिता म्हणते की, होय सर काल तिने पाय चेपून दिले तेही तेल लावून. त्यावर पुन्हा रितेश म्हणतो की, हा प्रवास खरचं खूप चांगला आहे की, तो गळ्यापासून पायापर्यंत आला आहे. पुन्हा अंकिता म्हणते की, यामुळे आम्हाला कळतच नाही की, कोणती जान्हवी खरी आहे. त्यानंतर बिग बॉस मेरे ढोलना हे गाणं लावतात, त्यावर अंकिता आणि जान्हवी दोघीही थिरकताना दिसतात.
खिलाडी कुमार वाचणार आर्याचे मेसेज?
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात अक्षय कुमार रॅपर आर्याच्या फोनमधले मेसेज वाचणार आहे. पण आर्या मात्र अक्षयला जोरात मेसेज वाचून दाखवण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे आता खिलाडी कुमार आर्याचे मेसेज वाचणार की नाही हे जाणून घेण्यासाठी आजचा भाऊचा धक्का नक्की पाहा.
ही बातमी वाचा :
'Almost Convinced...,' नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समंथा प्रभूची कमेंट चर्चेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)