'Almost Convinced...,' नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समंथा प्रभूची कमेंट चर्चेत
Samantha Prabhu : सोशल मीडियावर एका इन्फ्लूएन्सरने समंथाला लग्नाची मगाणी घातल्यानंतर तिच्या कमेंटची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
Samantha Prabhu : अभिनेत्री समंथा प्रभू (Samantha Prabhu) हिच्या एक्स नवऱ्याने नुकताच साखरपुडा उरकला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर समंथाच्या पोस्टही बरीच चर्चा झाली. नागा चैतन्य (Naga Chaitanya) याने अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. हे असं असतानाच दुसरीकडे एका सोशल मिडिया इन्फ्लूएन्सरने समंथा प्रभूला लग्नाची मागणी घातली आहे.
एका सोशल मिडिया इन्फ्लूएन्सरने संमथाला लग्नाची मागणी घातलीच पण या व्हिडीओवर समंथाने केलेल्या कमेंटची बरीच चर्चा सुरु झालीये. त्यामुळे नवऱ्याचा साखरपुडा उरकल्यानंतर समंथाला आलेल्या या लग्नाच्या मागणीची चांगलीच चर्चा रंगू लागलीये.
सोशल मीडियावरील तो रिल नेमका काय?
या व्हिडीओमध्ये हा सोशल मिडिया इन्फ्लूएन्सरने व्हिडीओ करत समंथाला लग्नासाठी प्रपोज केलं. यामध्ये तो त्याची बॅग घेऊन समंथाच्या घरी जात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे या व्हिडीओच्या मागे त्याने एआयच्या माध्यमातून तयार केलेले बॅकग्राऊंडही दिसत आहेत. यामध्ये विशेष लक्ष वेधून घेतलंय ते त्याच्या मागे तयार करण्यात आलेल्या जिमच्या बॅकग्राऊंडने. याचवरुन समंथाने केलेली कमेंट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
समंथाची कमेंट नेमकी काय?
समंथाने त्या व्हिडीओवर कमेंट करत म्हटलं की, 'बॅकग्राउंडला जीम दिसत असल्यामुळे मी होकार देते, मी कनव्हिन्स झाली आहे.' तिची ही कमेंट पाहून त्या सोशल मिडिया इन्फ्लूएन्सरच्या आनंदाला पारा राहिलेला नसल्याचंही पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
नागा-शोभिताने उरकला साखरपुडा
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या डेटिंगच्या चर्चा मागील एक वर्षापासून सुरू होत्या. मात्र, या दोघांनी कधीही यावर भाष्य केले नाही. मात्र, गुरुवारी (8 ऑगस्ट 2024) सकाळी या दोघांनी साखरपुडा उरकला. यावेळी अतिशय मोजकीच मंडळी उपस्थिती होती. हा साखरपुडा पार पडल्यानंतर नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी सोशल मीडियावर या दोघांचे फोटो शेअर करत चाहत्यांना ही गुड न्यूज दिली. आमच्या कुटुंबात शोभिताचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. नवीन जोडप्याचं खूप खूप अभिनंदन! त्यांना आयुष्यभर प्रेम आणि आनंदासाठी शुभेच्छा अशी कॅप्शनही त्यांनी लिहिली होती.
2021 मध्ये नागा चैतन्य आणि समंथा विभक्त
नागा चैतन्य आणि समंथा रुत प्रभूची भेट 'ये माया चेसवा' चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यांच्यातील मैत्रीचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं. काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने धून धडाक्यात लग्न केलं. पण, त्यांच नातं जास्त काळ टिकलं नाही. नाग चैतन्यने ऑक्टोबर 2021 मध्ये साऊथ सुपरस्टार समंथा रुथ प्रभूला घटस्फोट दिला.