जेव्हा रतन टाटा यांनी बिग बींकडून मागितलेले पैसे..., मित्राच्या आठवणींना उजाळा देताना अमिताभ बच्चन भावुक
Amitabh Bachchan Remembers Ratan Tata on KBC 16 : केबीसी 16 मध्ये अमिताभ बच्चन यांनी मित्र रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी ते भावुक झाले.
Amitabh Bachchan Remembers Ratan Tata on KBC 16 : भारतातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचं 9 ऑक्टोबरला निधन झालं. त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. रतन टाटा यांच्या निधनावर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. कौन बनेगा करोडपती सीझन 16 मध्ये होस्ट बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मित्र रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा दिला. केबीसी 16 च्या आगामी एपिसोडचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये बिग बी दिवंगत रतन टाटा यांचं कौतुक करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा प्रोमो चांगलाच व्हायरल होत आहे.
जेव्हा रतन टाटा यांनी बिग बींकडून मागितलेले पैसे...
केबीसीच्या नव्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन यांनी दिवंगत रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा दिला, यावेळी ते भावुक झाले. बिग बींनी एक किस्सा सांगितला, ज्यावेळी त्यांनी रतन टाटा यांच्यासोबत फ्लाईटने प्रवास केला होता. अमिताभ बच्चन यांनी शोमध्ये हा किस्सा शेअर करताना सांगितलं की, रतन टाटा फार सामान्य माणसाप्रमाणे राहत होते. त्यांनी रतन टाटा यांच्यासोबत घालवलेले क्षण आठवले, जेव्हा त्यांनी एका विमानाने प्रवास केला होता.
मित्राच्या आठवणींना उजाळा देताना अमिताभ बच्चन भावुक
कौन बनेगा करोडपती 16 मध्ये आगामी एपिसोडमध्ये अभिनेता बोमन ईराणी आणि दिग्दर्शक फराह खान पाहुणे म्हणून येणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो निर्मात्यांनी शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन दिवंगत रतन टाटा यांची आठवण काढतात. रतन टाटा यांच्यासोबत घालवलेला वेळ आठवत त्यांनी एक किस्सा सांगितला, ज्यावेळी रतन टाटा यांनी अमिताभ बच्चन यांच्याकडे पैसे मागितले होते.
नेमकं काय घडलं होतं?
दिवंगत रतन टाटा यांची आठवण काढताना अमिताभ बच्चन म्हणाले, "रतन टाटा काय माणूस होते, मी सांगूही शकत नाही. ते खरोखरच खूप साधे होते. एकदा आम्ही दोघे एकाच फ्लाईटने लंडनला प्रवास केला होता. आम्ही हीथ्रो एअरपोर्टवर उतरलो. तेव्हा त्यांनी जे लोक घ्यायला येणार होते, ते तिथे नव्हते. त्यामुळे रतन टाटा एका फोन बूथमध्ये गेले, थोड्या वेळाने ते तिथून बाहेर आले आणि मी कधी विचारही केला नव्हता की, ते असं काही करतील. काही वेळाने माझ्या जवळ आले आणि ते जे बोलले त्यावर माझा विश्वासच बसला नाही. ते म्हणाले, अमिताभ, मी तुमच्याकडून काही पैसे उधार घेऊ शकतो का? माझ्याकडे फोन करण्यासाठी पैसे नाहीत".
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :