एक्स्प्लोर
Advertisement
2 फाईव्ह स्टार हॉटेल, 1 हेलिकॉप्टर, जस्टिन बिबरच्या मागण्यांची यादी
मुंबई: इंटरनॅशनल पॉप सिंगर जस्टिन बिबर एका भव्य म्युझिक कॉन्सर्टसाठी भारतात येत आहे. 10 मे रोजी नवी मुंबईतील डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर हा कार्यक्रम होणार आहे.
मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने जस्टिन बिबरने मागण्यांची एक भली मोठी यादीच पाठवली आहे.
व्हाईट फॉक्स इंडियाने जस्टिन बिबरची जी 'डिमांड लिस्ट' जारी केली आहे, ती वाचून तुम्हीही डोक्याला हात लावाल.
काय आहे डिमांड लिस्ट?
- 5 स्टार हॉटेलमध्ये 13 रुम बुक करा. सुरक्षेच्या कारणास्तव एक नव्हे तर 2 फाईव्ह स्टार हॉटेल बुक करा.
- जस्टिन बिबरच्या ड्रेसिंग रुममधील सर्व पडदे पांढरे शुभ्र हवे. त्याच्या रुममध्ये काचेचा फ्रीज हवा
- जस्टिन बिबरच्या खोलीत पाण्याच्या 24 बाटल्या, एनर्जी ड्रिंकच्या 4, व्हिटॅमिन वॉटरच्या 6 बाटल्या, 6 क्रीम सोडा आणि विविध फळांचा रस
- खाण्यामध्ये विविधता असावी, त्यासाठीही मोठी यादी पाठवली आहे. त्यामध्ये व्हेज आणि नॉन व्हेज जेवणाचा समावेश आहे.
- हेल्थ फूडच्या नावे नारळ पाणी, बदाम शेक, प्रोटीन पावडर, शुद्ध देशी मध, केळी आणि हर्बल टीसह ताजी फळं
- जस्टिन बिबरच्या जवळपास कुठेही लिलीची फुलं दिसू नयेत
- जस्टिन बिबरच्या संपूर्ण टीमसाठी विविध साईझचे टी-शर्ट
- जस्टिन बिबरचा ताफा नेण्यासाठी 10 लग्झरी कार, 2 वॉल्वो बस
- या ताफ्याला सुरक्षा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा पथक हवं
- याशिवाय बिबरचे 8 सुरक्षा गार्डही त्यांच्या सुरक्षेसाठी सोबत असतील.
- जस्टिन बिबर परफॉर्म करण्यासाठी हॉटेलपासून स्टेडियमपर्यंत रस्तेमार्गे नाही तर चॉपर (हेलिकॉप्टर) ने जाणार
- जस्टिन बिबर ज्यावेळी प्रवास करेल, त्यावेळी 10 कंटेनर साहित्य त्याच्यासोबत असेल. यामध्ये त्याचा सोफा सेट, प्ले-स्टेशन, वॉशिंग मशीन आणि टेबल-टेनिसचं टेबल यासारख्या साहित्याचा समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement