एक्स्प्लोर
Advertisement
एअर इंडिया कपिल शर्मावर कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत
मुंबई : विमान प्रवासादरम्यान प्रवाशांकडून होणाऱ्या मनमानी आणि गैरवर्तनाच्या घटनेते दिवसेंदिवस वाढ होत आहे. विशेषत: व्हीव्हीआयपी प्रवासी आणि सेलिब्रिटींविरोधात एअर इंडियाने कठोर पावलं उचलण्याची तयारी केली आहे. एअर इंडिया कॉमेडियन आणि टीव्ही स्टार कपिल शर्माला समज देण्याच्या तयारीत आहे.
सुनील ग्रोव्हरशी भांडण आणि शिवीगाळ
काही दिवसांपूर्वी कपिल शर्माने ऑस्ट्रेलिया-भारत विमानात राडा केला होता. कपिल शर्माने सहकलाकार सुनील ग्रोव्हरसोबत भांडण केलं. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कपिलने सुनीलवर चप्पल फेकली आणि शिवीगाळही केली.
कपिलच्या वर्तनावर अहवाल
एअर इंडियाचे प्रमुख अश्विनी लोहानी यांनी उड्डाणादरम्यान कपिल शर्माच्या वर्तनावर अहवाल मागितला आहे. याशिवाय त्याला याच आठवड्यात समज दिला जाऊ शकतो.
दारु प्यायल्यानंतर कपिलचा आरडाओरडा
16 मार्च रोजी कपिल शर्मा सहकलाकारांसोबत मेलबर्न-दिल्ली फ्लाईटच्या बिझनेस क्लासमधून (AI 309) प्रवास करत होता. सूत्रांच्या माहितीनुसार त्याने मद्यपान केलं होतं. यानंतर तो त्याच्या टीमवर ओरडत होता. हे ऐकून सहप्रवासीही आश्चर्यचकित झाले. तेव्हा केबिन क्रूने कपिलला शांत राहण्यास सांगितलं. शिवाय एका वृद्ध महिलेनेही कपिल शर्माला सुनावलं होतं. यानंतर कपिलने केबिन क्रूची माफी मागितली आणि स्वत:च्या जागेवर बसला.
संबंधित बातम्या
'द कपिल शर्मा शो' बंद होण्याची चिन्हं, सुनील ग्रोव्हरचा नवा शो?
कपिल शर्माचा माफीनामा, सुनिल ग्रोव्हरचं उत्तर
कपिलच्या शोवरुन सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात तणाव?
सुनिल ग्रोव्हरसोबतच्या भांडणावर कपिल शर्माची फेसबुक पोस्ट
...म्हणून कपिल शर्मानं विमानातचं सुनिल ग्रोवरला धुतलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
महाराष्ट्र
मुंबई
बीड
Advertisement