एक्स्प्लोर

Marathi Serials TRP : जुई गडकरीची 'ठरलं तर मग' महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका! स्टार प्रवाहच्या मालिकांना प्रेक्षकांची पसंती; झी मराठी पडलं मागे

Tharla Tar Mag : जुई गडकरीची (Jui Gadkari) 'ठरलं तर मग' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे.

Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. अभिनेत्री जुई गडकरीच्या (Jui Gadkari) 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेने नेहमीप्रमाणे या आठवड्यातही टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...

1. टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.3 रेटिंग मिळाले आहे.

2. 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून टीआरपीच्या रेसमध्ये ही मालिका चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 5.4 रेटिंग मिळाले आहे.

3. 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.3 रेटिंग मिळाले आहे.

4. 'लक्ष्मीच्या पावलांनी' (Lakshmichya Pavalani) ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.2 रेटिंग मिळाले आहे.

5. टीआरपी लिस्टमध्ये 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका पाचव्या स्थानावर आहे. या मालिकेला 4.2 रेटिंग मिळाले आहे.

6. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सहाव्या क्रमांकावर असून या मालिकेला 4.1 रेटिंग मिळाले आहे.

7. 'कुन्या राजाची गं तू रानी' (Kunya Rajachi Ga Tu Rani) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सातव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 4.0 रेटिंग मिळाले आहे.

8. सिद्धार्थ जाधवचा 'धिंगाणा' (Dhingana) हा कार्यक्रम टीआरपीमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या कार्यक्रमाला 3.6 रेटिंग मिळाले आहे.

9. 'शुभविवाह' (Shubhvivah) ही मालिका नवव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 3.5 रेटिंग मिळाले आहे.

10. 'मुरांबा' (Muramba) ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 3.3 रेटिंग मिळाले आहे.

स्टार प्रवाहच्या मालिकांना प्रेक्षकांची पसंती

छोट्या पडद्यावर विविध चॅनल असून सध्या स्टार प्रवाहवरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. झी मराठी, कलर्स सारख्या मोठ्या बॅनर असणाऱ्या मालिका पाहायला प्रेक्षक नापसंती देत आहेत. अभिनेत्री जुई गडकरीची 'ठरलं तर मग' ही मालिका गेल्या काही आठवड्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळेसध्या जुईचं छोट्या पडद्यावर राज्य आहे, असं म्हणायला हरकत नाही.

संबंधित बातम्या

Bhagya Dile Tu Mala : कावेरी आणि राजवर्धनच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची चाहुल, पण किमयामुळे नात्याला नवं वळण येणार? मालिका रंजक वळणावर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad- Jyoti Mangal Jadhav यांचा संबंध काय, FC रोडवरील संपत्तीचं गौडबंगाल काय? Vastav EP 122Walmik Karad Mother : माझ्या लेकाला न्याय मिळाला पाहिजे, सगळे गुन्हे खोटे, वाल्मिकच्या आईची सादWalmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजीDhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
मंत्रालयातील ती लॅम्बोर्गिनी कुमार मोरदानींची, 116 एकर जमिनीची फाईल घेऊन मंत्र्यांसमोर; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
मंत्रालयातील ती लॅम्बोर्गिनी कुमार मोरदानींची, 116 एकर जमिनीची फाईल घेऊन मंत्र्यांसमोर; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
Embed widget