Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिका चालण्याची नेमकी कारणं काय? स्टार प्रवाह चॅनलचे सतीश राजवाडे म्हणाले,"चर्चा करायला..."
Aai Kuthe Kay karte : 'आई कुठे काय करते' ही महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका आहे. आता या मालिकेत मजेदार ट्विस्ट आला असून स्टार प्रवाहचे (Star Pravah) हेड सतीश राजवाडे (Satish Rajwade) यांनी पत्रकार परिषदेत मालिका चालण्याची कारणे सांगितली आहेत.
Aai Kuthe Kay karte Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या सव्वा चार वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत एक रंगतदार ट्विस्ट आला आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकारांसह प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान या मालिकेच्या पत्रकार परिषदेदरम्यान स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीचे कंटेंट आणि प्रोग्रामिंग प्रमुख सतीश राजवाडे (Satish Rajwade) यांनी 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या यशाबद्दल भाष्य केलं आहे.
'आई कुठे काय करते' मालिका चालण्याची कारणे काय? (Aai Kuthe Kay Karte Success Reason)
मराठी मनोरंजनसृष्टीतील अष्टपैलू सिनेदिग्दर्शक काही दिवसांपासून स्टार प्रवाहचे बिझनेस हेड म्हणून काम करत आहेत. आता 'आई कुठे काय करते' मालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मालिका चालण्याची कारणं आणि सीरियलच्या यशाबद्दल भाष्य केलं आहे. सतीष राजवाडे म्हणाले (Satish Rajwade on Aai Kuthe Kay Karte),"एका व्यक्तीमुळे कोणताही यशस्वी प्रवास होत नाही. त्यामागे एक संपूर्ण मोठी टीम लागते. या मालिकेच्या यशाचं संपूर्ण श्रेय मी माझ्या टीमला देतो. स्टार प्रवाह वाहिनी, प्रोडक्शन, दिग्दर्शक आणि मालिकेच्या संपूर्ण टीमचं हे यश आहे. एखाद्या मालिकेसाठी एक खूप मोठी यंत्रणा काम करते".
सतीश राजवाडे पुढे म्हणाले,"आई कुठे काय करते' ही महाराष्ट्राची लाडकी मालिका आहे. आज ही मालिका एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. मला खात्री आहे की, याआधी जितकं प्रेम मालिकेला मिळालं तितकचं किंबहुना त्यापेक्षाही जास्त प्रेम या नव्या प्रवासाला मिळेल. कारण पुन्हा एकदा एक सर्जनशील गोष्ट प्रेक्षकांना पाहायला आवडेल. प्रेक्षकांना चर्चा करायला आवडेल, असा प्रयत्न पुन्हा एकदा आम्ही या मालिकेच्या माध्यमातून करत आहोत. हा प्रवास जेव्हा सुरू झाला तेव्हा फार वेगळा होता. आई खरोखर हिरो असते. पण ते आपण कधी सेलिब्रेट करत नाही. 99% आपण आईला गृहित धरतो. आईशिवाय पाण हालत नाही. पण आईलादेखील कधीतरी ज्या कुटुंबासाठी ती झटते त्यांची साथ सोडावी लागते".
"चुकलं तर शाळा घ्या पण मालिकेवर प्रेम करत राहा" : आई कुठे काय करतेच्या लेखिका
'आई कुठे काय करते' या मालिकेच्या लेखिका म्हणाल्या,"चार वर्षांपेक्षा अधिक काळ 'आई कुठे काय करते'चा प्रवास सुरू आहे. आतापर्यंत अरुंधतीला आई, पत्नी, प्रेयसी म्हणून दिसून आली आहे. एक आई म्हणून अरुंधती सगळ्यांच्या पाठीशी उभी होती. आता या खडतर प्रवासात अरुंधतीला कुटुंबातील कोणाकोणाची साथ मिळते हे मालिकेच्या आगामी भागांमध्ये पाहायला मिळेल. चुकलं तर ओरडा पण मालिकेवर असचं प्रेम करत राहा".
संबंधित बातम्या