Aai Kuthe Kay Karte: आशुतोष घेतोय अरुंधतीची काळजी; 'आई कुठे काय करते !'च्या प्रोमोनं वेधलं लक्ष
नुकताच (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेच्या आगामी एपिसोडचा एक प्रोमो रिलीज झाला आहे.
Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला आणि कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. नुकताच या मालिकेच्या आगामी एपिसोडचा एक प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
आई कुठे काय करते या मालिकेच्या प्रोमोमध्ये आशुतोष हा अरुंधतीची काळजी घेताना दिसत आहे. आशुतोष अरुंधतीच्या डोक्याला बाम लावतो. त्यानंतर तो अरुंधतीला म्हणतो, 'हा बाम खूप इफेक्टिव आहे, यामुळे डोक्याची भणभण कमी होते आणि शांत झोप लागते.' त्यानंतर अरुंधती अनिरुद्धला म्हणते, 'तुम्हाला कसं कळलं माझं डोकं भणभणतंय?'
अरुंधतीच्या प्रश्नाला आशुतोष उत्तर देतो, 'मला तुझ्याकडे बघून तुझ्या मनामध्ये काय चालु आहे ते कळतं. दरवेळा 100 टक्के कळतं असं नाही पण बऱ्याचवेळा कळतं. तुझा चेहरा बोलका आहे, हे मी तुला आधीच सांगितलं आहे.' त्यानंतर अशुतोष अरुंधतीच्या डोक्याला बाम लाऊन दोते.
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
आई कुठे काय करते मालिकेच्या काही दिवसांपूर्वीच्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आले की, अनिशच्या सांगण्यानुसार, आशुतोष अरुंधतीला घेऊन लॉन्ग ड्राइव्हसाठी निघतो. त्यावेळी तो अरुंधतीला त्याची गाडी चालवण्यास सांगतो. तिचा आत्मविश्वासदेखील वाढवतो. या भागात प्रेक्षकांना अरुंधती, आशुतोष यांचा रोमान्स पाहायला मिळाला. लॉन्ग ड्राइव्ह दरम्यान अरुंधतीला पाणीपुरी खाण्याची इच्छा होते. त्यानंतर ते दोघे रस्त्यावर पाणीपुरी खातात.
आई कुठे काय करते मालिकेमध्ये अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) या अरुंधती ही भूमिका साकारतात. मधुराणी या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ त्या शेअर करतात. इन्स्टाग्रामवर त्यांना 238K फॉलोवर्स आहेत. इन्स्टाग्रामवरील त्यांच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. मधुराणी यांनी अनेक नाटक, मालिकांमध्ये काम केलं आहे. आई कुठे काय करते या मालिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली.
आई कुठे काय करते या मालिकेत ओंकार गोवर्धन हा आशुतोष ही भूमिका साकारतो. या मालिकेमध्ये अनिरुद्ध देशमुख ही भूमिका अभिनेते मिलिंद गवळी हे साकारतात. तर संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते.
संबंधित बातम्या
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत पुन्हा लगीनघाई! अरुंधती-आशुतोष पाणीपुरी डेटवर