Aai Kuthe Kay Karte : ‘जोडीदाराची गरज वाटली तर आशुतोषचा नक्की विचार करेन!’, अरुंधती आपल्या निर्णयावर ठाम
Aai Kuthe Kay Karte : तुला तुझं भविष्य आशुतोषसोबत दिसत असेल, तर त्याच्याशी लग्न कर, असा सल्ला अनिरुद्धने अरुंधतीला दिला आहे.
Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत आता प्रेक्षकांना एक वळण पाहायला मिळणार आहे. मालिकेतील ‘आई’ अर्थात अरुंधती आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आता पुन्हा एकदा कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहे. यासाठी तिने लेक ईशाची मदत मागितली आहे. दुसरीकडे संजना पुन्हा एकदा अरुंधतीच्या आयुष्यात लुडबुड करण्यास सुरुवात करत आहे. आधीच आपली आई आता आपल्यासोबत कॉलेजमध्ये येणार या विचाराने वैतागलेल्या ईशाला तिने भडकवायला सुरुवात केली आहे.
आशुतोषचा अपघात झाल्यानंतर खचून गेलेल्या अरुंधतीला पाहून अनिरुद्ध देखील दुःखी झाला आहे. तुला तुझं भविष्य आशुतोषसोबत दिसत असेल, तर त्याच्याशी लग्न कर, असा सल्ला अनिरुद्धने अरुंधतीला दिला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा समृद्धी बंगल्यामध्ये नवा ड्रामा पाहायला मिळणार आहे.
... तर आशुतोषचा नक्की विचार करेन!
नुकताच मालिकेचा एक प्रोमो आउट झाला आहे. यामध्ये अरुंधती देशमुखांच्या समृद्धी बंगल्यात येऊन त्यांनाच काहीतरी बोलताना दिसत आहे. एकीकडे आता आई आपल्यासोबत कॉलेजमध्ये येणार याचा ईशाला राग येतोय. तर, दुसरीकडे अभिषेक देखील आई मैत्री कशी करू शकते यावरून तिच्यावर चिडला आहे. स्वतःच्या आईवर चिडलेला अभिषेक आता देशमुखांचं घर सोडून वेगळं राहायला जाण्याचा विचार करत आहे. तर, सगळेच या गोष्टींसाठी अरुंधतीला कारणीभूत ठरवत आहेत.
यावर संतापलेली अरुंधती समृद्धीमध्ये येऊन ठामपणे देशमुखांना सांगते की, मी लग्नासाठी अजिबात उतावळी नाही. मी एकदा लग्न करून झाले. मनसोक्त संसार केलाय. आता माझी पुन्हा इच्छा नाही. पण, याचा अर्थ असा होत नाही की, मला आयुष्यभर जोडीदाराची गरज भासणार नाही. जेव्हा भासेल, तेव्हा मी आशुतोषचा नक्की विचार करेन. आता आमच्यात फक्त मैत्री आहे. लग्न करूनही ती टिकतात असे नाही, असे म्हणत ती संजना आणि अनिरुद्धला टोमणा देखील देते. अरुंधतीच्या या प्रवासात अप्पा, यश, अनघा, केदार, विशाखा, अविनाश असं पूर्ण देशमुख कुटुंब सोबत आहे. यांच्या साथीनेच अरुंधती तिचा नवा प्रवास पूर्ण करते आहे.
हेही वाचा :
Panchayat Season 2 : प्रेक्षकांसाठी सरप्राईज! ठरलेल्या वेळेच्या दोन दिवस आधीच रिलीज झाली ‘पंचायत 2’