एक्स्प्लोर

Mumbai News: नवा गडी नवं राज्य फेम बालकलाकार साईशा भोईरच्या आईच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल; लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप

साईशा भोईरच्या आईच्या विरोधात कफ परेड पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून आज पोलिसांनी साईशाच्या कल्याण मधील घरात झाडाझडती घेतली आहे. 

Mumbai News: छोट्या पडद्यावरील  रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) या लोकप्रिय मालिकेमधील कार्तिकी या भूमिकेमुळे आणि नवा गडी नवं राज्य (Nava Gadi Nava Rajya) या मालिकेतील चिंगी या भूमिकेमुळे बालकलाकार साईशा भोईरला (Saisha Bhoir) विशेष लोकप्रियता मिळाली. साईशा भोईरच्या आईच्या विरोधात कफ परेड पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून आज पोलिसांनी साईशाच्या कल्याण मधील घरात झाडाझडती घेतली आहे. 

मुंबई कुलाबा परिसरात राहणारे  मयुरेश पत्की यांची पत्नी नेहा यांची  2022 दरम्यान साईशा भोईरची आई पूजा भोईरशी ओळख झाली होती.पूजा भोईरची  (Pooja Bhoir) मुलगी साईशाचा अभिनय अवडत असल्यानं नेहा या साईशाला इंस्टाग्रामवर फॉलो करत होत्या. साईशा भोईर हिचे अकाउंट तिची आई पूजा भोईर ही वापरत होती. त्यामुळे  इंस्टाग्रामवर नेहा आणि पूजा भोईर यांची ओळख झाली. नेहा आणि पूजा या दोघी मोबाईल वरून एकमेकांच्या संपर्कात राहिल्या.त्यांची फोनवर चांगलीच मंत्री झाली होती. पूजा ही अल्गो ऑप्शन्स स्ट्रेटरी मॉडेल्स नावाने गुंतवणुकीचा व्यवसाय करत असल्याचे तिनं नेहा यांना सांगितलं.  तसेच केलेल्या गुंतवणुकीवर आठवड्यास दहा दहा टक्के नफा मिळून देण्याचे आमिश दाखवून नेहा यांचा विश्वास संपादन करून पूजाने गुंतवणुकीची रक्कम परत मिळेल याची हमी देऊन नेहा यांना अल्गो ऑप्शन्स स्ट्रेटरी यात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. 

त्यानंतर नेहा पत्की यांनी पूजा भोईरच्या आयडीबीआय बँकेच्या खात्यावर सहा लाख रुपये टाकले. असे करता करता पुढे नेहा यांनी सोळा लाख रुपये गुंतवणूक केली. काही दिवस गुंतवणुकीचा  परतावा मिळाला. मात्र नंतर हा परतावा देण्यास पूजाने  टाळाटाळ केली. पूजानं नेहा यांना परताव्याचा चेक देखील  दिला होता मात्र तो चेक बाऊन्स झाला याबाबत  नेहा यांनी पुजाला विचारले असता तिने तक्रारदाराला  आरेरावीचे उत्तर दिले. अखेर याप्रकरणी कफ परेड रोड पोलिसांनी पूजा भोईरच्या कल्याण मधील घरात छापमारी करत पूजा भोईरला ताब्यात घेतले आहे. 

साईशा भोईरला इन्स्टाग्रामवर जवळपास 229K  फॉलोवर्स आहेत. सायशा ही सध्या नवा गडी नवं राज्य  या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Pooja Kadam-Bhoir (@pooja_kadam_bhoir)

संबंधित बातम्या

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' उत्कंठावर्धक वळणावर; कार्तिक घेणार दीपाचा जीव?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget